शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत गौराईचे साहित्य खरेदीसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

इचलकरंजी : लाडक्या गणरायाचे शुक्रवारी सर्वत्र वाजतगाजत आगमन झाले, असून रविवारी १२ सप्टेंबर रोजी गौरींचे घरोघरी आगमन होणार आहे. ...

इचलकरंजी : लाडक्या गणरायाचे शुक्रवारी सर्वत्र वाजतगाजत आगमन झाले, असून रविवारी १२ सप्टेंबर रोजी गौरींचे घरोघरी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर गौरींचे मुखवटे, साड्या, दागदागिने, सजावटीचे साहित्य यासह वैविध्यपूर्ण साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू होती.

गणरायाच्या आगमनानंतर घरोघरी वेध लागतात ते गौरी आगमनाचे. यंदा रविवारी गौरींचे आगमन होणार असून घरोघरी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सजावटीसाठी लागणारे साहित्य, गौरींचे मुखवटे, साडी-चोळी, साजशृंगाराच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सजावट साहित्य, मुखवटे यांच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. गौरींचे चारशे रुपयांपासून पाच हजारांपर्यंत विविध प्रकारचे व आकारात मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत. मुखवटे खरेदीसोबतच मंगळसूत्र, बांगड्या, नथ, मोत्याच्या माळा, जोडवी अशा पारंपरिक दागिन्यांसह विविध दागिन्यांची खरेदी करण्यास पसंती मिळत आहे. गौरींचे रविवारी आगमन होणार असून सोमवारी १३ सप्टेंबर रोजी घरोघरी पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करून पुरणपोळीसह विविध पदार्थांचा नैवेद्य गौरींना दाखविण्यात येणार आहे. गौरींना नैवेद्य दाखवताना बटाटा, भेंडी, गवार, आळू, मुळा, वाटाणा, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, घोसाळे, पालक अशा विविध सोळा प्रकारच्या भाज्यांचा समावेश केला जातो.

महापुरामुळे पुरवठा व किमतींवर परिणाम

यंदाच्या महापुरामुळे शेतातील अनेक पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे यावर्षी गौरींसाठी लागणाऱ्या साहित्याचे पाण्यामुळे खूप नुकसान झाले आहे. याचा परिणाम म्हणजे हे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले नाही. पुरवठा कमी असल्याने मागील वर्षीपेक्षा अधिक किमतीने साहित्याची विक्री सुरू आहे.

फोटो ओळी

इचलकरंजी : गौराईचे आगमन होणार असल्याने साहित्य व मुखवटे यांची खरेदी करताना महिला.