शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीच्या महिलेचा गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:55 IST

इचलकरंजी / कुरुंदवाड/ पणजी : इचलकरंजी-बोरगांव रस्त्यावर कर्नाटक हद्दीत एका महिलेचा गळा दाबून खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. दिशा दिनेश पाटील (वय ३७, रा. थोरात चौक, इचलकरंजी. मूळ रा. कवठेमहांकाळ) असे मृत महिलेचे नाव आहे.चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच तिचा खून केल्याची तक्रार नातेवाइकांनी सदलगा पोलीस ठाण्यात दिली आहे.दरम्यान, मोबाईलच्या लोकेशनवरुन ...

इचलकरंजी / कुरुंदवाड/ पणजी : इचलकरंजी-बोरगांव रस्त्यावर कर्नाटक हद्दीत एका महिलेचा गळा दाबून खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. दिशा दिनेश पाटील (वय ३७, रा. थोरात चौक, इचलकरंजी. मूळ रा. कवठेमहांकाळ) असे मृत महिलेचे नाव आहे.चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच तिचा खून केल्याची तक्रार नातेवाइकांनी सदलगा पोलीस ठाण्यात दिली आहे.दरम्यान, मोबाईलच्या लोकेशनवरुन तिचा पती दिनेश हा गोवा येथे असल्याची माहिती सदलगा पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी छायाचित्रासह दिनेशची माहिती दिल्यावर पणजी पोलिसांनी त्याला मिरामार येथे अटक केली. कर्नाटक पोलीस गोव्यात येवून संशयिताला घेऊन जातील, अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील थोरात चौकातराहणाऱ्या दिनेश पाटील याचा कवठेमहांकाळच्या दिशा यांच्याबरोबर बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. घरगुती वाद-विवादामुळे दिशा व दिनेश हे दिनेशच्या आई-वडिलांपासून विभक्त राहत होते. त्यांचा कागद विक्रीचा व्यवसाय आहे तसेच दिनेश हा सुताचाही व्यवसाय करतो. या दोघांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद-विवाद झाला होता. त्या वादातून दिशा जयसिंगपूर येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. शनिवारी (दि. ११) दिनेशने जयसिंगपूरला जाऊन तेथे चर्चा केली होती तसेच समजूत काढून दिशाला सोबत घेत सांगलीतील एका पाहुण्यांना भेटून सगळे काही मिटल्याचे सांगून आनंदाने बाहेर पडले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दोघेही इचलकरंजीतील घरी पोहोचलेच नाहीत.दरम्यान, रविवारी पहाटेच्या सुमारास बोरगाव रस्त्यावर गळा दाबून खून केलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. अधिक तपास केला असता हा मृतदेह दिशा यांचा असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डी. टी. प्रभू, पोलीस निरीक्षक एम. एस. नायकर, संगमेश दिडगीनहाळ यांनी भेट दिली. घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतर चिकोडी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदलगा पोलीस ठाणे तसेच थोरात चौकातील घराजवळ नातेवाईक व नागरिकांनी गर्दी केली होती.कवठेमहांकाळच्या कोठावळे कुटुंबीयांना धक्काकवठेमहांकाळ : दिशा यांचे माहेरचे आडनाव कोठावळे आहे. दिशाला दोन विवाहित बहिणी आहेत. एक भाऊ दोन वर्षापूर्वी अपघातात ठार झाला आहे. त्यामुळे दिशाच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला होता.या धक्क्यातून सावरतानाच त्यांना मुलीच्या खुनामुळे दुसराधक्का बसला आहे. दोन वर्षांत घडलेल्या या दोन घटनांनी हेकुटुंब हादरून गेले आहे. दिशाचे वडील आण्णासाहेब कोठावळेयांना दूरध्वनीवरून खुनाच्या घटनेची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.