लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल होतानादिसत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून सक्षमपणाने वाहतूक आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.चार वर्षांपूर्वी नगरपालिकेने मंजुरी दिलेला शहर वाहतूक आराखडा प्रशासनाकडून यंदा राबविण्यास परवानगी मिळाली. सुरुवातीलाच जाहीर करण्यात आलेली तारीख बदलण्यात आली. त्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली. दुसºयांदा अंमलबजावणीची तारीख जाहीर करताना कोणताही गाजावाजा न करता अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, नागरिकांना सक्षमपणाने याबाबत माहितीच मिळाली नसल्याने त्याचा बोजवारा उडू लागला. आराखड्यातील योजनेनुसार बस वाहतूक वगळता अन्य कोणतीच शिस्त लागल्याचे अद्याप दिसत नाही.सम-विषम तारखांना पार्किंग हा प्रकार शहरात पहिल्यांदाच सुरू करण्यात आला असल्याने त्याविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. संबंधित ठिकाणच्या दुकानदारांना तशा सूचना देऊन वाहन लावण्यासाठी येणाºया नागरिकांना सम-विषम पार्किंगबाबत सांगायला लावणे, न ऐकल्यास कडक अंमलबजावणी करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, तसेच शहरातील मुख्य मार्गावरील अवजड वाहनांची बंदी, याबाबतही अवजड वाहनाने माल मागविणाºया संबंधित दुकानदारांना सूचना करणे, अंमलबजावणी करण्यास भाग पाडणे, खासगी वाहतुकीसाठी मुख्य मार्गावर तासन्तास थांबून राहणाºया ट्रॅव्हर्ल्स् कार्यालयांना नोटीस देऊनही ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करणे, अशी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.वाहतूक शाखेसह शहरातील तीनही पोलीस ठाण्यांतील पोलिसांना सोबत घेऊन चार-पाच दिवस सलग सूचना, कारवाई करीत नागरिकांना शिस्त लावणे गरजेचे बनले आहे; अन्यथा हा प्रायोगिक तत्त्वावरील वाहतूक आराखडा कागदोपत्रीच राहील आणि शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था तशीच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे.
इचलकरंजीत वाहतूक आराखड्याचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:22 IST
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल होताना दिसत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून सक्षमपणाने वाहतूक आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.
इचलकरंजीत वाहतूक आराखड्याचा बोजवारा
ठळक मुद्दे♦नागरिकांना सम-विषम पार्किंगबाबत सांगायला लावणे,♦वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने पाहावे,♦न ऐकल्यास कडक अंमलबजावणी करणे,♦नागरिकांना सक्षमपणाने याबाबत माहितीच मिळाली नसल्याने त्याचा बोजवारा