शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

इचलकरंजीतील टंचाईसाठी जलनीती अवलंबावी

By admin | Updated: March 29, 2017 00:39 IST

प्रदूषणमुक्ती समितीचे नगराध्यक्षांना निवेदन : स्थानिक पाणी स्रोतासंबंधी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

इचलकरंजी : शहराला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईप्रश्नी शाश्वत उपाययोजना करण्याऐवजी शहर पातळीवर जलनीती अवलंबावी. त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल. त्याचबरोबर स्थानिक पाणी स्रोतासंबंधी श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सोमवारी इचलकरंजी प्रदूषणमुक्ती निर्धार समितीच्यावतीने नगराध्यक्षा अलका स्वामी यांना देण्यात आले. यासंदर्भात लवकरच एक व्यापक बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही नगराध्यक्षा स्वामी यांनी शिष्टमंडळाला दिली.पाण्याचा अनियंत्रित उपसा, सातत्याने होणारी गळती आणि जलप्रदूषण यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहराला पाणीटंचाईचा प्रश्न सतावत आहे. त्यातच प्रदूषणामुळे आणि काविळीच्या संकटानंतर पंचगंगा नदीतूनही नीटसा पाणी उपसा करता येत नाही. तसेच कूपनलिकाही आटत चालल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी पालिका प्रशासन आणि नागरिकांचा टँकर वा कूपनलिका खोदण्यावर भर दिसून येत आहे. बाहेरून पाणी आणणे किंवा भूगर्भातील पाणी उपसत राहणे या शाश्वत उपाययोजना नाहीत. म्हणून या प्रश्नावर शहर पातळीवर जलनीती अवलंबण्याची गरज व्यक्त करत संदीप चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्षांची भेट घेऊन निवेदन सादर केले.निवेदनात, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरात अस्तित्वात असणाऱ्या जलसाठ्यांचे संरक्षण, संवर्धन करून त्यामधून नागरी पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या पाच कोटी लिटर इतक्या नागरी, औद्योगिक सांडपाण्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. पाणी गळती शोधून ती थांबवली जाऊ शकते. हे सर्व करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी लोकसहभागातून जलनीती अवलंबणे अतिशय गरजेचे आहे. प्रदूषित ओढे, विहिरी यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक स्रोतांच्या सफाईचे काम झाल्यास त्याद्वारे पाण्याचे पुनर्भरण करता येऊ शकेल आणि शाश्वत स्वरूपात जलनीती शहर पातळीवर अवलंबता येईल, असे म्हटले आहे.यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबळे, नगरसेवक सागर चाळके, शशांक बावचकर, अब्राहम आवळे, महादेव गौड यांच्यासह नागरिक उपस्थित होते. शिष्टमंडळात प्रसाद कुलकर्णी, राजू आरगे, राजू नदाफ, अमित बियाणी, दयानंद लिपारे, आदींचा समावेश होता. (वार्ताहर)काळा ओढ्याच्या लांबीच्या प्रवाहामध्ये ४०,००० टन इतका नागरी-रासायनिक घनकचरा अडकल्याचा अंदाज आहे. हा कचरा काढण्याची जबाबदारी प्रशासनाकडून तत्काळ निर्देशित केली जावी. तसेच ठोस कृती व जलनीती अवलंबण्याबरोबरच श्वेतपत्रिका काढावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.