कोल्हापूर : सिगारेट कोठे मिळते ते दाखवतो, असे सांगून इचलकरंजीतील एका प्रवाशाला कोल्हापुरात पंचगंगा घाट परिसरात नेऊन बेदम मारहाण करून लुटणाऱ्यास स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केली. आकाश चंद्रकांत मुळे (वय ३०, रा. गणेश कॉलनी, शिंगणापूर, ता. करवीर) असे त्या लुटारूचे नाव आहे, त्याच्या ताब्यातून लुटलेला मोबाईल व दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड पोलिसांनी हस्तगत केली. त्याचा साथीदार मात्र फरार आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निखिल सुधीर कुलकर्णी (३८, रा. जानकी अपार्टमेंट, गावभाग, इचलकरंजी) हे कोल्हापुरात एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री ते इचलकरंजीला जाण्यासाठी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. त्यावेळी सिगारेट कोठे मिळते, हे दाखविण्याचे निमित्त करून अज्ञात दोघांनी त्यांना आपल्या दुचाकीवर बसवून पंचगंगा नदीघाट येथे नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व सोन्याच्या दोन अंगठ्या घेऊन दोघेही पसार झाले. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक लुटारूंचा शोध घेत होते. संबंधीत लुटारू हे समर्थ कॉलनी ते शिंगणापूर मार्गावरून जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या रोडवर सापळा रचून संशयित आरोपी आकाश मुळे याला पकडले. त्याने गुन्ह्यात वापरलेली मोपेड, लुटलेला मोबाईल व सोन्याच्या दोन अंगठ्या असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पो. नि. प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
फोटो नं. १५०९२०२१-कोल-क्राईम०१
ओळ :
दहा दिवसांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून प्रवाशाला उचलून पंचगंगा घाट येथे नेऊन लुटणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून लुटीतील दागिनेे, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.
150921\15kol_11_15092021_5.jpg
ओळ : दहा दिवसापूर्वी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून प्रवाशाला उचलून पंचगंगा घाट येथे नेऊन लुटणार्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. त्याच्याकडून लुटीतील दागिणे, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.