शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत घरफाळावाढ

By admin | Updated: March 1, 2017 00:52 IST

३२५ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर : अन्य करवाढ नाही; शिल्लक १८.६४ कोटी; अनुदानात ५.५ कोटींची कपात

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये ३२५ कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करताना १८.६४ कोटी रुपयांची शिल्लक दाखविण्यात आली. चतुर्थ वार्षिक कर आकारणीमध्ये झालेली घरफाळा वाढ वगळता या अंदाजपत्रकात अन्य कोणतीही करवाढ झाली नाही. नगरपालिकेचा आयजीएम दवाखाना शासनाकडे वर्ग झाल्यामुळे दवाखान्याला मिळणाऱ्या ५.५ कोटी रुपयांच्या अनुदानाची कपात या अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट झाली आहे.नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांनी सन २०१७-१८ च्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी मंगळवारची सभा आयोजित केली होती. अंदाजपत्रकामध्ये काही त्रुटी असल्याबद्दलचा आक्षेप विरोधी पक्षाचे नगरसेवक विठ्ठल चोपडे व शशांक बावचकर यांनी उपस्थित केला. या त्रुटींवर आणि त्याबाबत करण्यात आलेल्या खुलाशासंदर्भात सभेमध्ये सविस्तर चर्चा झाली. चर्चेमध्ये सत्तारूढ पक्षाच्यावतीने तानाजी पोवार, अजित जाधव, सागर चाळके, रवींद्र माने, विरोधकांच्यावतीने संजय कांबळे, उदयसिंह पाटील, ध्रुवती दळवाई, तेजश्री भोसले, आदींनी भाग घेतला. सभेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांना व शंकांना मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी उत्तरे दिली.नगरपालिकेकडील महसुली जमा म्हणून घरफाळ्यापोटी १६ कोटी ५१ लाख रुपये, पाणीपट्टीचे सहा कोटी ३९ लाख रुपये, जल व मल:निस्सारण करासाठी एक कोटी ९९ लाख रुपये, नगरपालिका सहायक अनुदान ८४ कोटी ३३ लाख रुपये, नगरपालिकेच्या असलेल्या विविध व्यापारी संकुल, सभागृहे व अन्य भाडे आकारणीपोटी दोन कोटी ५२ लाख रुपये, गुंठेवारी विकास आकारणी व शुल्क ५८ लाख रुपये, बांधकाम परवाना शुल्क एक कोटी २६ लाख रुपये, विविध प्रकारच्या गुंतवणुकीतील मिळणारे व्याज तीनकोटी २९ लाख रुपये, आदी ठळक तरतुदी दाखविण्यात आल्या आहेत.नगरपालिकेकडील होणाऱ्या विविध प्रकारच्या खर्चामध्ये नोकर पगार ७९ कोटी १९ लाख रुपये, पाणीपुरवठा वीज खर्च ६ कोटी ८० लाख रुपये, नगरपालिका इमारती व रस्त्यावरील दिवाबत्तीसाठी दोन कोटी ५० लाख रुपये, विविध योजनांसाठी घेतलेले कर्ज व व्याजाचे हप्ते पाच कोटी दोन लाख रुपये, भुयारी गटार देखभाल दुरुस्ती एक कोटी ५० लाख रुपये, पाणीपुरवठा खात्याकडील व्यवस्था व दुरुस्ती चार कोटी रुपये, नवीन गटारी बांधणे व गटारी दुरुस्ती दोन कोटी ५० लाख रुपये, पाणीपट्टी भरण्यासाठी दोन कोटी रुपये, बालोद्यान विकसित करणे ८९ लाख रुपये, शहरातील कचऱ्याचा उठाव करणे दोन कोटी ५० लाख रुपये, घनकचरा व्यवस्थापन दोन कोटी रुपये, शिक्षण मंडळाकडील विनाअनुदानित खर्च ८४ लाख रुपये, शाहू हायस्कूलकडील खर्च ५२ लाख ५० हजार रुपये, महिला व बालकल्याण समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी एक कोटी ५ लाख रुपये, रस्ते डांबरीकरण सहा कोटी रुपये, दलित वस्ती सुधारणा एक कोटी ५७ लाख रुपये, अमृत योजनेतून वारणा योजना प्रकल्प राबविणे ३१ कोटी ५० लाख रुपये, या तरतुदी केल्या आहेत. (प्रतिनिधी)‘पीडब्ल्यूडी’च्या रस्ता कामावरून वादविशेष रस्ता अनुदान योजनेतून शहरातील २२ रस्त्यांची कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करून घेण्याबाबतचा विषय चर्चेस आला असता सत्तारूढ व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून होणाऱ्या रस्त्यांची कामे निकृष्ट असून, या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार सुरेश हाळवणकर यांचा नामोल्लेख करणारे फलक लावल्याबद्दल नगरसेवक उदयसिंह पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यावेळी भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार व पाटील यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. या विषयात सत्तारूढ पक्षाकडून सागर चाळके, अजित जाधव, रवींद्र माने, तर विरोधी पक्षाकडून विठ्ठल चोपडे, शशांक बावचकर, राजू बोंद्रे, आदी एकाच वेळी उठून बोलू लागल्याने सभागृहात गोंधळ उडाला. सुमारे वीस मिनिटांच्या गोंधळानंतर चाळके व चोपडे यांनी सर्वच नगरसेवकांना शांत केले. हा विषय ३० विरुद्ध २४ मतांनी सत्तारूढ पक्षाने मंजूर केला.