शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदाच्या भीतीपोटीच दादांचे इचलकरंजीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 12, 2015 00:52 IST

हसन मुश्रीफ : हाळवणकरांना नामोहरम करण्याचे राजकारण

कोल्हापूर : गेले ५२ दिवस इचलकरंजीतील पेटलेल्या सायझिंग कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना वेळ नाही. महापालिका निवडणुकीत पराभव झाला तर कदाचित आपले मंत्रिपद जाईल, मग जनतेतून निवडून आलेले आमदार सुरेश हाळवणकर त्यावर दावा करतील. या भीतीपोटीच हाळवणकर यांना नामोहरम करण्यासाठी इचलकरंजीमधील प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा घाट पालकमंत्र्यांनी घातल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली. आमदार मुश्रीफ म्हणाले, सायझिंग कामगार, मालक यांच्यामध्ये तोडगा निघेना, अनेक बैठका झाल्या लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख यांचा निर्णय दोन्ही घटकांना मान्य नाही. इचलकरंजी जिल्ह्याची शान आहे, या शहरातील हजारो कामगारांच्या चुली गेले पन्नास दिवस पेटलेल्या नाहीत. सायझिंगधारक, यंत्रमागधारक मालक बँकांची कर्जे कशी भागवायची, या विवंचनेत आहेत, अशी परिस्थिती असताना वस्त्रोद्योग मंत्री पाटील एकदाही इचलकरंजीला गेले नाहीत, याचे आश्चर्य वाटते. मग संधी आलीच तर हाळवणकर यांना नामोहरम करण्यासाठी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे राजकारण मंत्री पाटील खेळत असावेत, असे आमच्यासारख्या सामान्य बुद्धी असणाऱ्याला वाटते. त्यांनी काळजी करू नये, भाजपचे अध्यक्ष अमित शहा त्यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांच्या मंत्रिपदाला कोणताही धोका येणार नाही. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाची काळजी न करता इचलकरंजीत बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. (प्रतिनिधी)...मग दहीहंडीला वेळ कसा?  --इचलकरंजीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने कामगार, यंत्रमालकांसह आमच्यासारखे कार्यकर्तेही हवालदिल झाले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री पाटील यांच्याकडे वेळ नाही, पण ‘चाय पे चर्चा’, आमच्यावर टीका करण्यासाठी, दहीहंडी कार्यक्रमासह जिल्ह्यातील इतर कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी वेळ कसा मिळतो, असा सवाल आमदार मुश्रीफ यांनी केला.