शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

इचलकरंजीच्या विद्यार्थिनीची मुंबईत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा (वय २०, रा. इचलकरंजी) असे तिचे नाव असून आत्महत्येपूर्वी तिने मित्राला व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज करून आपल्या कृत्याबाबत कल्पना दिली होती. या प्रकाराने महाविद्यालयात शोककळा पसरली आहे.भाग्यलक्ष्मी मुठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा (वय २०, रा. इचलकरंजी) असे तिचे नाव असून आत्महत्येपूर्वी तिने मित्राला व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज करून आपल्या कृत्याबाबत कल्पना दिली होती. या प्रकाराने महाविद्यालयात शोककळा पसरली आहे.भाग्यलक्ष्मी मुठा ही मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीची असून महापालिकेच्या नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. मात्र अभ्यासक्रम अवघड जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून ती अस्वस्थ होती. पालकांनी शिक्षणासाठी मोठा खर्च केल्याने महाविद्यालय मधेच सोडल्यास घरच्यांची बेअबु्र होईल, अशी भीती तिला वाटत होती. त्यामुळे मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये कोणी नसताना तिने पंख्याला ओढणी अडकवून गळफास लावून घेतला. एकच्या सुमारास तिच्या खोलीतील मैत्रिण तिथे आली असता हा प्रकार उघडकीस आला. मैत्रिणीने आरडाओरड करत इतरांना कळविले. भाग्यलक्ष्मीला केईएम रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.पोलिसांना घटनास्थळी ‘सुसाईड नोट’ आढळली नाही. मात्र आत्महत्येच्या थोड्या वेळापूर्वी तिने ‘रेडिओलॉजिस्ट’विभागात शिकत असलेल्या आपल्या मित्राला व्हॉटस्अ‍ॅपवर त्याबाबत मॅसेज केल्याचे आढळून आल्याचे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप उगले यांनी सांगितले. याबाबत हॉस्टेलमधील तिचे अन्य सहकारी, मित्र मंडळीकडे चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.तो मेसेज शेवटचा ठरला...भाग्यलक्ष्मीने मनातील भावना मित्राला व्हॉटस्अ‍ॅपद्वारे बोलून दाखवली होती. त्या मेसेजमध्ये तिने बीडीएसचे शिक्षण अवघड जात असून घरच्यांनी शिक्षणासाठी खुप खर्च केल्याने सोडू शकत नसल्याचे स्पष्टपणे लिहिले होते. यामुळे निराश असून जीवनाचा अंत करावासा वाटतो, मला सगळ्यांनी माफ करावे, असेही स्पष्ट केले होते. त्यावर मित्राने तिला मेसेज पाठवत समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मित्राच्या मेसेजकडे दुर्लक्ष करत भाग्यलक्ष्मीने आयुष्याचा शेवट करुन घेतला.....................................