शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

इचलकरंजीचे चौघे समुद्रात बुडाले

By admin | Updated: July 20, 2015 00:05 IST

तारकर्लीतील घटना : मुलाचा मृत्यू, तिघांना वाचविण्यात यश

मालवण : इचलकरंजी येथून तारकर्लीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांतील चार मुले बुडाल्याची घटना घडली आहे. यातील इतर तीन मुलांना वाचविण्यात यश आले, तर यात सलोनी राजेंद्र्रकुमार मेहता (वय १७, रा. इचलकरंजी, कोल्हापूर) या मुलीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना एमटीडीसीच्या किनाऱ्यावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. तारकर्ली येथे शनिवारी सायंकाळी इचलकरंजी येथील कपड्यांचे व्यापारी मेहता आणि लालवाणी कुटुंबीयांतील १३ सदस्य टेम्पो ट्रॅव्हर्ल्समधून आले होते. रविवारी सकाळी सात वाजता सर्व पर्यटक समुद्र्रस्नानासाठी समुद्रात उतरले. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना समुद्र्रात आत जाऊ नका, असे सांगितले. काही वेळाने कुटुंबीय किनाऱ्यावर स्नान करीत होते, तर मुले समुद्र्रात आत जाऊन मौजमस्ती करीत होती. सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्याने शिटी वाजवीत बाहेर येण्याची सूचना केली; मात्र पर्यटकांनी दुर्लक्ष केल्याने हा अनर्थ घडल्याचे बोलले जात होते. तिघांना वाचविण्यात यश सुरक्षा रक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत निधी दिनेश लालवाणी (वय १३), किंजल विजयकुमार लालवाणी (१५), महावीर सुरेश लालवाणी (९) व सलोनी मेहता (१७) हे चौघे समुद्रात आत गेल्यानंतर मोठ्या लाटेत गटांगळ्या खाऊ लागले. यात सलोनी समुद्रात आत खेचली जाऊ लागली. त्यावेळी कुटुंबीयांनी चौघांनाही पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलोनी पाण्यात जास्त काळ राहिल्याने ती अत्यवस्थ बनली होती. चौघांनाही तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सलोनी जास्त काळ पाण्यात राहिल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पांचाळ यांनी सांगितले. महावीर याला तत्काळ पाण्यातून बाहेर काढण्यात यश आल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, तर निधी आणि किंजल यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांना वाचविण्यात यश आल्याचे डॉ. पांचाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)...तर कायदेशीर कारवाई करणार : बुलबुले सध्या समुद्र खवळलेला असतो. अशावेळी मच्छिमार तसेच पर्यटकांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देऊनही उतरतात. मासेमारी बंदी कालावधी असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून मच्छिमार मासेमारी करतात. आतापर्यंत अशांवर कारवाई केली नाही. मात्र, यापुढे मृत्यूस कारणीभूत ठरल्यास गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी स्पष्ट केले.