शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

इचलकरंजीच्या नगराध्यक्षांना अभय

By admin | Updated: June 19, 2015 00:36 IST

सुरेश हाळवणकर यांची माहिती : मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त

इचलकरंजी : नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना शहर विकास आघाडीचा पाठिंबा कायम आहे, असे म्हणत आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. पवार यांच्या जागी ‘आयएएस’ दर्जाचा मुख्याधिकारी इचलकरंजी नगरपालिकेस द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.आठवड्यांच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आमदार हाळवणकर यांनी नगराध्यक्षा बिरंजे यांना अभय दिले. ते म्हणाले, पालिकेतील विकासकामे, पारदर्शीपणा आणि नागरी सेवा-सुविधांसाठी ‘शविआ’ ने त्यांना पाठिंबा दिला आहे; पण काही गैरव्यवहार दिसल्यास तो ‘शविआ’ हाणून पाडेल. त्यासाठी उदाहरण देताना कूपनलिकांवर पाणबुडे पंप व पाण्याच्या टाक्या बांधण्याच्या निविदेत भ्रष्टाचार दिसताच ती निविदा ‘शविआ’ ने हाणून पाडल्याचे आमदार हाळवणकर यांनी स्पष्ट केले.मुख्याधिकारी पवार यांचा प्रशासनावर वचक नसल्याने नगरपालिकेच्या कामकाजामध्ये वारंवार गोंधळ उडत आहे. कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी नगरपालिकेमध्ये बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रामध्ये कुणीतरी पाणी ओतले; पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी ‘नागरिकांची सनद (सिटीजन चार्टर)’ नगरपालिकेने स्वीकारला असली, तरी त्याची प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नाही. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी आयएएस दर्जाचा मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही कॅमेरे न बसविण्याचे गौडबंगालशहरातील काही प्रमुख ठिकाणी, तसेच नगरपालिका कार्यालयात पालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार होते. मात्र, फक्त घोषणा करून कॅमेरे न बसविण्यामागे कोणते गौडबंगाल आहे, असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. ते म्हणाले, नगरपालिका कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गैरव्यवहारांना आळा बसेल. हाणामारी होणार नाही. ज्यामुळे नगरपालिकेची पर्यायाने शहराची प्रतिष्ठा वाढेल म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे मी माझ्या आमदार फंडातून बसविणार आहे.मक्तेदार नगरसेवकांमुळे दर्जाहीन कामेनगरपालिकेमध्ये मूठभर नगरसेवक हे मक्तेदार झाले आहेत. त्यांनी त्यांच्या सग्या-सोयऱ्यांच्या नावावर मक्ता घेतल्याने पालिकेची कामे दर्जाहीन होत असून, बिले मंजूर करून घेण्यासाठी दबाव टाकला जातो. प्रसंगी वाद घालत हाणामारी केली जाते. शिवीगाळ व धक्काबुक्की होण्यासारख्या प्रसंगाने इचलकरंजी नगरपालिकेचे सभागृह बदनाम होत आहे. म्हणून मुख्याधिकाऱ्यांना अशा नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यास सांगितले आहे. मात्र, त्यांच्याकडून हे काम होत नसल्याचे निदर्शनास येत आहे, असाही आरोप हाळवणकरांनी पत्रकारांशी बोलताना केला.