शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील युवक जागीच ठार

By admin | Updated: October 25, 2015 01:08 IST

मोटारसायकल बसखाली सापडून दुर्घटना

इचलकरंजी : येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ मुख्य रस्त्यावर मोटारसायकल घसरून एस.टी.बसच्या पाठीमागील चाकाखाली पडल्याने मोटारसायकलस्वार तरुण जागीच ठार झाला. प्रवीण राजेंद्र दोशी (वय २२, रा. श्रीपादनगर) असे त्याचे नाव आहे. टेलिफोन आॅफिसजवळ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांतून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रवीण हा शिवाजी पुतळ्याकडून संभाजी चौकाच्या दिशेने मोटारसायकल (एमएच 0९ सीवाय १२१७) वरून जात होता. याचवेळी कर्नाटक आगाराची एसटी बस (केए २३ एफ ५२८) घेऊन चालक एस. आर. हेंद्रे चिकोडीला जात होते. टेलिफोन आॅफिसजवळ एसटी बस मोटारसायकलला ओव्हरटेक करून पुढे जात असताना प्रवीण याने मोटारसायकल रस्त्याकडेला घेतली. त्याठिकाणी रस्त्यावर बारीक खडी पसरली होती. ब्रेक दाबल्याने मोटारसायकल घसरली आणि प्रवीण खाली पडला. तो एसटीच्या मागील चाकाजवळच पडला. त्यामुळे एसटीचे मागील चाक त्याच्या डोक्याला जोराने धडकले. त्यात त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला. एसटीचालकास धडक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने एसटी बस थांबवून तेथून पलायन केले. घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आले. घटनास्थळाचे मोबाईलवर चित्रीकरण आणि छायाचित्र घेण्यासाठी तरुणांची घाईगडबड सुरू होती. त्यामुळे पोलिसांना पंचनामा करताना अडथळा होत होता. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले. मात्र, तरीही जमाव वारंवार गर्दी करीत होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच दोशी याच्या नातेवाइकांनी आयजीएम रुग्णालयात गर्दी केली होती. त्याच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाचा मुलगा व आई-वडिल असा परिवार आहे. (वार्ताहर)