शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूमुळे इचलकरंजीत महिलेचा मृत्यू

By admin | Updated: July 12, 2017 16:47 IST

खासगी रुग्णालयात आठवडाभर उपचार केल्यानंतर प्रकृती अत्यवस्थ

आॅनलाईन लोकमतइचलकरंजी , दि.१३ :येथील मधुबन हौसिंग सोसायटीतील सुरेखा गजरे (वय ४५) यांचे स्वाईन फ्लूच्या आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलविले असता त्यांचे निधन झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.याबाबत समजलेली माहिती अशी, सुरेखा गजरे या घशाच्या विकाराने आजारी असल्यामुळे त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. खासगी रुग्णालयात आठवडाभर उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती मंगळवारी (दि.११) अत्यवस्थ झाली. परिणामी त्यांना ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून पाहिले असता त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.याबाबत नगरपालिकेच्या आरोग्य खात्यास माहिती समजताच पालिकेकडे असलेल्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाकडील कर्मचाऱ्यांना गजरे यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करण्यास सांगितले आहे. त्या परिसरातील तातडीने साफसफाई करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली. शहरातील खासगी रुग्णालये अथवा आरोग्य विषयक तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांना स्वाईन फ्लूची माहिती मिळताच ताबडतोब नगरपालिका व शासकीय रुग्णालयास कळवावी, असे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयजीएम हॉस्पिटलची हतबलता

शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या आयजीएम रुग्णालयाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंदचे आंदोलन सुरू केल्यामुळे स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्याबाबत आपणास कोणतीही हालचाल करता आली नाही. म्हणून पालिकेकडे असलेल्या राष्ट्रीय नागरी आरोग्य विभागास कळविले आहे, अशी माहिती आयजीएमच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सुप्रिया देशमुख यांनी सांगून आपली हतबलता दाखवली.