शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीवासीयांना बसणार टंचाईच्या झळा--कृष्णा नळयोजनेची दाबनलिका --

By admin | Updated: July 29, 2016 23:19 IST

बदलण्याचा प्रस्ताव रद्दच्या हालचाली वारणा योजना मंजूर झाल्याचा परिणाम

इचलकरंजी : वारणा नदीतून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणारी नळ योजना मंजूर झाल्याने कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेची दाबनलिका बदलण्याची २७ कोटी रुपयांची निविदा रद्द करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. परिणामी अत्यंत कुचकामी झालेल्या दाबनलिकेला वारंवार गळती लागत असल्याने शहरवासीयांना आता तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, नळपाणी योजनेबाबत गुरूवारी मुंबईत शासन स्तरावर झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे.शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पंचगंगा व कृष्णा या नदीतून पाणी उपसा करणाऱ्या दोन योजना सध्या कार्यान्वित आहेत. पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्यानंतर जानेवारी ते जून असे सहा महिने तिथून होणारा पाणीपुरवठा ठप्प होतो. त्यामुळे फक्त कृष्णा नदीतील पाणीपुरवठ्यावर शहराला चार ते पाच दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो. कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यानंतर तिथून होणारा पाणीपुरवठासुद्धा ठप्प होतो. तर १९ किलोमीटर लांबीच्या या योजनेची दाबनलिका जमिनीखालून टाकण्यात आल्यामुळे ती अत्यंत कुचकामी झाली आहे. त्यापैकी सात किलोमीटर लांबीची दाबनलिका यापूर्वी बदलण्यात आली आहे. उर्वरित अकरा किलोमीटर लांबीची दाबनलिका बदलण्याचा २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेण्यात आला.कृष्णा नदीची दाबनलिका बदलण्यासाठी नगरोत्थान योजनेमधून २७ कोटी रुपये मंजूर झाले. मात्र, हा प्रस्ताव शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आला. त्याप्रमाणे शासनाचा मिळणारा निधीसुद्धा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. जीवन प्राधिकरणकडून निविदा काढण्याच्या टप्प्यावर हे काम असताना नगरपालिका पाणीपुरवठा समितीचे सभापती दिलीप झोळ यांनी निविदा काढण्याचे काम नगरपालिकेमार्फत व्हावे, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.दरम्यान, वारणा नदीतून पाणी पुरवठा करणारी ७२ कोटी रुपयांची नवीन नळ पाणी योजना शासनाच्या अमृत योजनेतून मंजूर झाला आहे. त्यामुळे कृष्णा नळपाणी योजनेची दाबनलिका बदलण्याकामी २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव रद्दबातल करण्याच्या हालचाली शासकीय स्तरावर सुरू आहेत. नळ योजनेबाबत गुरूवारी मुंबई मंत्रालयात प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये कृष्णा नळ पाणी योजनेचा विषय चर्चेला घेण्यात आला होता. त्यामुळे कृष्णा नळपाणी योजनेची दाबनलिका बदलण्याचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)