शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत ‘पोस्टर युद्ध’

By admin | Updated: March 4, 2016 23:52 IST

भाजप-पालिकेत चढाओढ : नगराध्यक्षांचे मक्तेदाराला खडे बोल

राजाराम पाटील-- इचलकरंजी  आगामी महिला दिनानिमित्ताने शहरात ‘पोस्टर’ युद्ध चालू झाले असून भाजप महिला आघाडी व इचलकरंजी नगरपालिका यांच्यात चढाओढ निर्माण झाली आहे. शिवाजी पुतळा चौकातील मोक्याच्या ठिकाणी ‘पोस्टर’ लावण्यावरून खुद्द नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी नगरपालिकेच्या फलकालाच जागा दिली पाहिजे म्हणून संबंधित मक्तेदाराला खडे बोल सुनावले.भाजप महिला आघाडीच्यावतीने ६ व ७ मार्चला महिला महोत्सवाचे आयोजन केले असून होम मिनिस्टर आणि स्पॉट गेम शो, तसेच या रावजी... बसा भाऊजी हा खास महिलांसाठी लावणी शो आयोजित केला आहे. या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आदींच्या छब्या वापरल्या आहेत, तर नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा महिला महोत्सव ८, ९, १० व ११ मार्चला होत आहे. त्यामध्ये उद्घाटन, नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम, ‘लोकधून’ हा लोककला दर्शविणारा मराठमोळा कार्यक्रम, लावणी संग्राम हा लावणींचा कार्यक्रम, तसेच स्मार्ट सासू-सून, स्पॉट गेम अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या फलकावर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, सभापती प्रमिला जावळे, उपसभापती मंगल मुसळे, आदींचे फोटो झळकले आहेतशिवाजी पुतळा चौकातील एस. टी. स्टँडच्या आवारात पण कोपऱ्यावरील मोक्याच्या ठिकाणी इचलकरंजी नगरपालिकेचा महिला महोत्सवाचा फलक लावला होता, पण नगरपालिकेच्या महिला महोत्सवापूर्वी सहा तारखेला भाजप महिला आघाडीचा महिला महोत्सव असल्यामुळे नगरपालिकेचा फलक काढून त्याठिकाणी भाजप महिला आघाडीचा फलक लावण्यात आला. याबाबतची माहिती नगराध्यक्षा बिरंजे यांना समजताच त्या कमालीच्या संतापल्या. त्यांनी ताबडतोब पालिकेतील बाजार कर खात्यामार्फत संबंधित मक्तेदाराला पालिकेत बोलावले. ‘त्या’ फलकाच्या ठिकाणी आमचा नगरपालिकेचा फलक लागला पाहिजे. त्यासाठी त्याला एक तासाची मुदत देण्यात आली. या मुदतीत पालिकेचा फलक लागला नाही, तर तुमचे शहरातील सर्व फलकांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही नगराध्यक्षांनी दिला.मात्र, भाजप महिला आघाडीचा फलक काढायचा म्हणजे खुद्द आमदारांना दुखावल्यासारखे होईल. म्हणून नगरपालिका आणि संबंधित मक्तेदारांनी युक्ती केली आणि भाजप महिला आघाडीच्या जवळ अन्य चार फलकांवर नगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या महिला महोत्सवाचे फलक झळकावले. यामुळे आमदार पण खुश आणि नगराध्यक्षांची मर्जी पण राखली गेली, असे ‘एका दगडात दोन पक्षी...’ राखण्याची ‘नामी आयडिया’ लढविली. निवडणुका आणि डिजिटल फलकसाधारणत: आगामी नऊ महिन्यांमध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि महिला महोत्सवाचेही शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे भाजप आणि नगरपालिका या दोघांनीही महिला महोत्सव जोरदार करण्याचे आयोजन केले. त्यामुळे शहरात सर्वत्र डिजिटल फलक झळकविण्यात आले आहेत.