शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

इचलकरंजीतील टोळ्या ‘मोका’टच!

By admin | Updated: July 25, 2016 00:57 IST

शहरात दहशत : माळी टोळीप्रमाणे मुसक्या आवळण्याची गरज

अतुल आंबी ल्ल इचलकरंजी शहापूर, तारदाळ व खोतवाडी या ग्रामीण परिसरासह औद्योगिक वसाहतीत खंडणी, खून, अपहरण यासह गंभीर गुन्हे करून दहशत पसरविणाऱ्या अमोल माळीच्या टोळीवर इचलकरंजी पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. या कारवाईचे नागरिकांतून स्वागतच होत आहे. मात्र, शहरातील अवैध व्यवसायाच्या माध्यमातून आपली दहशत पसरविणाऱ्या टोळ्या अद्याप मोकाटच आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमोल माळी याच्यासह आठजणांच्या टोळीवर शहापूर पोलिसांनी मोका (संघटित गुन्हेगारी) कायद्यांतर्गत कारवाई केली. गंभीर दहा गुन्ह्यांत सहभाग असल्याने मोकाअंतर्गत कारवाई करणे पोलिसांना शक्य झाले. मात्र, अन्य गुन्हेगारांची परिस्थिती वेगळीच आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनीच कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. कारण अनेक मोठ्या गुन्हेगारांनी प्रत्येक गुन्ह्यावेळी सहकारी बदलले आहेत. तर गंभीर गुन्ह्यांमध्ये काही वर्षांचे अंतर टाकले आहे. त्यामुळे असे गुन्हेगार मोका कायद्याच्या तडाख्यात सापडण्यापासून बचावतात. वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात देशातील अनेक राज्यांतून नागरिक याठिकाणी व्यवसायासाठी येऊन रहिवाशी झाले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांबरोबर अशा काही प्रवृत्तीही शहरात आल्या. त्यांनी स्थानिक गुंडांबरोबर हातमिळवणी करून आपले साम्राज्य निर्माण केले. अवैध व्यवसाय, त्यातून मिळणारा पैसा या माध्यमातून तरुणांना भुरळ घालून आपल्या जाळ्यात ओढले. कमी श्रमातून मिळणारा अधिक पैसा, भुरटा रूबाब या भूलभुलय्यात अडकून असे तरुण काहीही करायला तयार असतात. कायद्याचा व पोलिसांचा धाक कमी झाल्यानेच अशी गुन्हेगारी फोफावते. चिल्लर फाळकूटदादाही एखाद्या पोलिसाबरोबर सलगी करून रूबाबात फिरतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सरकार बदलते, मंत्री बदलतात, पोलिस अधिकारीही बदलतात. मात्र, शहरातील गुंड, गुन्हेगार तसेच राहतात. या गुन्हेगारांना गजाआड करून सर्वसामान्य जनतेला कोणाकडून न्याय मिळणार का? वर्षानुवर्षे आपले साम्राज्य प्रस्थापित करून उजळ माथ्याने मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न जनतेतून व्यक्त होत आहे. ‘मोका’ कायद्यातील तरतूद ‘मोका’ कायद्याच्या तरतुदीनुसार दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन सलग तीन वर्षांच्या कालावधीत पैसे मिळविण्याच्या उद्देशाने केलेले गंभीर गुन्हे दाखल झाल्यास मोका अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे शहरातील काही नामी गुन्हेगार याच्या तडाख्यात सापडण्यापासून बचावतात. अनेक गुन्हेगारांना नगरसेवकपदाची स्वप्ने ४इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने अनेक गुन्हेगारी जगतातील गुंडांना नगरसेवक बनण्याची स्वप्ने पडत आहेत. त्या पद्धतीने भागात ‘फिल्डिंग’ लावण्याचे कामही काहीजणांनी सुरू केले आहे. ४अवैध मार्गाने पैसे कमवायचे आणि राजकारणात येऊन ‘व्हाईट कॉलर’ बनून आपली प्रतिमा उजळ करण्याचा हा प्रयत्न आहे. यांना जनतेशिवाय आता रोखणार तरी कोण? शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रवृत्तींना मते देऊन नेता बनवू नका, असा संदेश देण्यास सुरुवात केली आहे. जनतेने डोळसपणे मतदान केल्यास अशा प्रवृत्ती ठेचल्या जातील.