शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील गोसावी झोपडपट्टीचे रूपडे पालटणार

By admin | Updated: April 26, 2017 00:48 IST

वसाहतीवरील आरक्षण रद्द : मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा ७०० कुटुंबांना लाभ

इचलकरंजी : शहरातील गोसावी झोपडपट्टीच्या जागेवर असलेले कन्या शाळा विस्तारीकरण व क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. झोपडपट्टीचे आहे त्याच जागी पुनर्वसन करण्यासही मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळातील या निर्णयाचा लाभ सुमारे ७०० कुटुंबांना होणार आहे.येथील टेलिफोन भवनसमोर गोसावी झोपडपट्टी नावाची वसाहत १०५०२ चौरस मीटर जागेवर वसली आहे. या झोपडपट्टीत बहुतांशी गोसावी समाजाची घरे असून, गेली ७० वर्षे ते येथील रहिवाशी आहेत. सन १९८१ मध्ये झालेल्या नगर नियोजन व विकास आराखड्यात झोपडपट्टीच्या जागेवर कन्या शाळा विस्तार व क्रीडांगण असे आरक्षण पडले. हे आरक्षण रद्द व्हावे आणि त्याच ठिकाणी झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करावे, यासाठी १९९९ पासून तत्कालीन नगरसेवक वसंत माळी हे शासन दरबारी प्रयत्न करीत होते.मात्र या जागेवर असलेले आरक्षण रद्द करावे व आहे त्याच ठिकाणी झोपडपट्टीचे पुनर्वसन करावे, अशा आशयाचा प्रस्ताव २०१० मध्ये नगरविकास मंत्रालयाने फेटाळला होता. परिणामी, गोसावी समाजाच्या या झोपडपट्टीवर टांगती तलवार कायम होती. त्यामुळे अज्ञानी व भंगार गोळा करून उपजीविका करणाऱ्या या झोपडपट्टीवासीयांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा करण्यात आला.पालिकेच्या प्रस्तावाप्रमाणे शासनाने मंजुरी द्यावी, यासाठी नगरसेवक माळी, आमदार सुरेश हाळवणकर यांनी जोरदार प्रयत्न केले. यामध्ये माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. अखेर या प्रयत्नांना मंगळवारी यश मिळाले. मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत गोसावी समाजाच्या झोपडपट्टीचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करून त्याठिकाणचे कन्या शाळा विस्तार व खेळाचे मैदान हे आरक्षण उठविण्यास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत झोपडपट्टीवासीयांनी फटाक्यांची आतषबाजी करून व साखर वाटून केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पाटील व आमदार हाळवणकर यांचे अभिनंदन करणाऱ्या घोषणा झोपडपट्टीवासीयांनी दिल्या. यावेळी बोलताना माजी नगरसेवक माळी म्हणाले, १८ वर्षे केलेल्या प्रयत्नांना आज यश प्राप्त झाले असून, अशा प्रकारे झोपडपट्टीच्या जागेवरील आरक्षण शासनाने रद्द करण्याची पहिलीच घटना आहे. (प्रतिनिधी)गोसावी समाज हा गरीब व काबाडकष्ट करून जगणारा असून, त्या जागेवर गेली ७० वर्षे ते राहत होते. त्यांच्या डोक्यावर असलेली आरक्षणाची टांगती तलवार दूर करण्यात यश आले. आता पंतप्रधान आवास योजनेतून त्यांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. त्यांचे राहणीमान उंचावे, यासाठी अन्य सेवा-सुविधाही त्यांना पुरविल्या जातील.- सुरेश हाळवणकर, आमदार