शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

इचलकरंजी : आठ बँकांचे अस्तित्व संपुष्टात

By admin | Updated: September 25, 2014 00:30 IST

ठेवीदारांचा जीव टांगणीला : सभासदांचे कोट्यवधी रुपयांचे भांडवल बुडाले

इचलकरंजी : आर्थिक शिस्त बिघडल्याने आणि काही मुजोर कर्जदारांनी अर्थसाहायाची परतफेड करण्यास हयगय केल्यामुळेच आठ सहकारी बॅँका लयाला गेल्या आहेत. सध्या चौंडेश्वरी सहकारी बॅँकेला रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक निर्बंध लावल्याने सहकारी बॅँकांचा विषय ऐरणीवर आला आहे.वास्तविक पाहता इचलकरंजीला संस्थानकाळापासून सहकार चळवळीची परंपरा आहे. येथील सेंट्रल को-आॅप. बॅँक, विविध कार्यकारी सोसायटी या संस्थांना तब्बल शंभर वर्षांचा इतिहास आहे. सेंट्रल बॅँकेचे पुढे इचलकरंजी अर्बन को-आॅप. बॅँकेत रूपांतर झाले. वस्त्रनगरीच्या वाढत जाणाऱ्या उद्योग-धंद्याबरोबर आर्थिक चणचण भासू लागली. म्हणून तत्कालीन नेतृत्वाने इचलकरंजी जनता सहकारी बॅँक, पीपल्स को-आॅप. बॅँक अशा बॅँकांची स्थापना केली. ज्यांच्या अर्थसाहाय्यावर इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाची भरभराट झाली.वाढत जाणाऱ्या वस्त्रोद्योगाच्या व्यापाराबरोबर शिवनेरी बॅँक, नूतन नागरी सहकारी बॅँक, कामगार बॅँक, चौंडेश्वरी बॅँक, इचलकरंजी महिला सहकारी बॅँक अशा बॅँकांची स्थापना झाली. पुढे सन १९९० नंतर वस्त्रनगरीच्या विकासाबरोबर सहकार क्षेत्रात नवीन दहा-बारा बॅँकांची भर पडली. अलीकडील दहा-पंधरा वर्षांत या बॅँकांमधील आर्थिक शिस्तीला ग्रहण लागले. काही बड्या कर्जदारांनी कर्जाचे हप्ते थकविले. बॅँकांना न्यायालयाच्या फेऱ्यात अडविले. काही घोटाळेही झाले. पीपल्स बॅँकेचे तत्कालीन व्यवस्थापक बी. एम. दानोळे यांनी एका बोगस वस्त्रोद्योग संस्थेच्या नावे चार लाख ९५ हजार रुपयांचे कोणतेही तारण नसताना कर्ज उचलले. त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल झाला. या प्रकरणी १५ सप्टेंबरला न्यायालयाने दानोळे यांना तीन वर्षे सक्तमजुरी व दीड लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.अशा प्रकारे शहरातील दोन बॅँका अन्य बॅँकांमध्ये विलीन झाल्या, तर सात बॅँका अवसायानात गेल्याने त्यांचे नामोनिशाण नष्ट झाले. बॅँकांकडे असणारे हजारो सभासदांचे कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल बुडाले, तर कोट्यवधी रुपये ठेवीमध्ये गुंतवणाऱ्या हजारो ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला. याचदरम्यान आर्थिक शिस्त पाळणाऱ्या आणि अटी-नियमांचे पालन करणाऱ्या काही बॅँकांनी मात्र नेत्रदीपक प्रगती साधलीय. सहकार क्षेत्रात लौकिक वाढत बहुराज्य कामगिरी बॅँका करीत आहेत. चौंडेश्वरी बॅँकेवर १ सप्टेंबरपासून रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक निर्बंध लावले आहेत. तीन आठवडे उलटले तरी बॅँकेच्या व्यवस्थापन मंडळाने बॅँक वाचविण्यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याने हजारो ठेवीदार, खातेदार व सभासदांचा जीव टांगणीला लागला आहे. (प्रतिनिधी)दोन विलीन, तर सात अवसायानातशहरातील शिवनेरी बॅँकेचे विलीनीकरण डोंबिवली बॅँकेत, महिला बॅँकेचे विलीनीकरण पारसीक बॅँकेत झाले; तर पीपल्स, कामगार, जिव्हेश्वर, लक्ष्मी-विष्णू, साधना, अर्बन या बॅँका अवसायानात निघाल्या. आता चौंडेश्वरी बॅँकेवरही आर्थिक निर्बंध आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.