शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

इचलकरंजीत यंत्रमागधारकांचे धरणे

By admin | Updated: July 28, 2016 00:52 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : वस्त्रोद्योगातील मंदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू

इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील मंदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी येथील प्रांत कार्यालय चौकात बुधवारपासून यंत्रमागधारकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह कारखानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दर्शविला.गेल्या वर्षापासून वस्त्रोद्योगाला मंदीचे ग्रहण लागले आहे. वीज आणि सूत दरातील सततची वाढ, तसेच कापडाला योग्य प्रमाणात नसलेली मागणी यामुळे यंत्रमागधारक नुकसान सोसून व्यवसाय चालवित आहे. यंत्रमाग व्यवसायाला शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीत घट झाल्याने यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. शहरातील बहुतांश यंत्रमागधारक आपले कारखाने आठवड्यातून काही वेळा बंद ठेवत आहेत. दरम्यान, हत्ती चौक परिसरातील यंत्रमागधारकाने कर्जास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जीवन बरगे, अमोद म्हेतर, रामचंद्र हावळ, जनार्दन चौगुले, रावसाहेब तिप्पे, बाळकृष्ण लवटे, गणेश शहाणे, सचिन भुते व फारुक शिरगावे यांनी बुधवारपासून प्रांत कार्यालय चौकात धरणे आंदोलन सुरू केले आहे. पाच दिवस हे आंदोलन सुरू राहणार असून, यातूनही शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनास वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपनगराध्यक्ष महावीर जैन, सागर चाळके, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, सदा मलाबादे, नरसिंह पारीक, संघटनेचे विश्वनाथ मेटे, विनय महाजन, नारायण दुरुगडे, प्रदीप धुत्रे यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि कारखानदारांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला. (वार्ताहर)शासनाने वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था आणावीइचलकरंजी : राज्यात शेतीखालोखाल रोजगार देणारा वस्त्रोद्योग मंदीच्या भयावह परिस्थितीतून जात आहे. त्याला सावरण्यासाठी राज्य शासनाने या उद्योगाकडे ताबडतोब लक्ष द्यावे. योग्य ती उपाययोजना करून या उद्योगाला ऊर्जितावस्था आणावी. जेणेकरून यंत्रमाग कारखानदारांबरोबर कामगारांचेसुद्धा जीवनमान उंचावेल, अशा आशयाचे पत्रक भारतीय कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सचिन खोंद्रे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.वस्त्रोद्योग मोडकळीस आल्यामुळे अनेक यंत्रमाग कारखानदार कर्जबाजारी झाले आहेत. अशा या यंत्रमागाची चाके मंदावली, तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठोपाठ यंत्रमागधारक व कामगार आत्महत्येस प्रवृत्त होतील. त्यामुळे विजेच्या दराची सवलत, वाढत जाणाऱ्या सुताचे भाव नियंत्रणात आणणे, तसेच कापड उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी खेळत्या भांडवलावर अनुदान, अशा सवलती शासनाने ताबडतोब लागू कराव्यात, असेही या पत्रकात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)