शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील व्यापारी पेढ्या उद्यापासून पाच दिवस बंद

By admin | Updated: July 7, 2017 01:23 IST

वस्त्रोद्योगातील सर्व घटकांनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क---इचलकरंजी : वस्त्रोद्योगासाठी लागू करण्यात आलेल्या जीएसटी करप्रणालीत सुलभता आणावी, या मागणीसाठी उद्या शनिवार पासून शहर व परिसरातील सर्व व्यापारी पेढ्या पाच दिवस बंद ठेवण्याची घोषणा इचलकरंजी पॉवरलूम अँड यार्न मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांनी गुरुवारी व्यापाऱ्यांच्या बैठकीत केली.सरकारने १ जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू केली असली तरी कमालीच्या संभ्रमावस्थेमुळे देशभरातील वस्त्रोद्योग केंद्रातील व्यापारी-व्यावसायिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवले आहेत. त्याचा परिणाम म्हणून इचलकरंजीतही कापड उत्पादनात घट झाली आहे. देशभरातील कापडाच्या पेठा बंद असल्याने इचलकरंजीतील कापडाची जावक ठप्प झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर गुरुवारी मर्चंटस् असोसिएशनच्या सभागृहात व्यापाऱ्यांची बैठक झाली.या बैठकीसाठी प्रोसेसर्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरीराज मोहता, लक्ष्मीकांत मर्दा, महावीर जैन, राजाराम चांडक, जगदीश छाजेड, भंवरलाल चौधरी, आदींसह विविध घटकांमध्ये कार्यरत असलेले व्यापारी उपस्थित होते. बैठकीत पूनमचंद दरगड, भीमकरण छापरवाल, चंदनमल मंत्री, बालकिसन छापरवाल, आदींनी मते व्यक्त केली. सर्व व्यापाऱ्यांकडून जीएसटीला विरोध करण्यासाठी संपूर्णपणे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.आपल्या प्रमुख भाषणात असोसिएशनचे अध्यक्ष गांधी म्हणाले, सरकारने कॉटन व सिंथेटिक कापडावर कर लावण्यासाठी केलेला भेदभाव रद्द करून समानता आणावी. वस्त्रोद्योगामधील एकाच घटकावर जीएसटी लागू करावा. एक महिन्याऐवजी तीन महिन्यांला रिटर्न भरण्याची मुभा ठेवावी, अशा मागण्या आहेत. शहर व परिसरातील वस्त्रोद्योगातील सर्व घटकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करून सोमवारी (दि. १०) प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. वस्त्रोद्योगातील सर्व घटकांनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले. जीएसटी करप्रणालीत सुलभता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलनवस्त्रोद्योगातील सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहनप्रांताधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्याचा निर्णय१२ जुलै रोजी आढावा बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार