शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी व परिसरातील यंत्रमागधारक संकटात

By admin | Updated: September 1, 2014 23:50 IST

कापड गाठी वाहतुकीचा संप : सहाशे ट्रक माल पडून

घन:शाम कुंभार -यड्राव -इचलकरंजी व परिसरातील उत्पादन होणारे कापड राजस्थानमधील पाली व जोधपूर येथे मोठ्या प्रमाणात जाते. त्या कापडकाठी वाहतुकीचे दर वाढवून घेण्यासाठी येथील वाहतूक कंपन्यांनी वाहतूक बंद केली आहे. यामुळे सुमारे पंधरा दिवसांपासून सहाशे ट्रक माल पडून राहिल्याने यंत्रमागधारक आर्थिक संकटात सापडला आहे. यामध्ये क्लॉथ मर्चट असोसिएशन व वाहतूक कंपनीमध्ये समन्वय होत नसल्याने यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.इचलकरंजी व परिसरामध्ये केंब्रिक व मलमलचे सुमारे सव्वा कोटी मीटर कापडाचे उत्पादन होते. हे कापड पुढील प्रक्रियेसाठी राजस्थानमधील पाली व जोधपूर येथे मोठ्या प्रमाणात जाते. एका ट्रकमधून अडीचशे गाठीची वाहतूक होते. याप्रमाणे दररोज चाळीस ट्रक पाली-जोधपूरकडे जातात. इचलकरंजी येथील सात ते आठ वाहतूकदार कंपन्यांच्या माध्यमातून कापड गाठीची वाहतूक केली जाते.पाली येथे कापडगाठी पोहोचल्यावर प्रती गाठ २८० रुपये असे वाहतूक भाडे आहे, ते भाडे चारशे दहा रुपये मिळावे, अशी वाहतूक कंपनीची मागणी आहे. भाडेवाढ देण्यास पाली येथील ग्राहक तयार नसल्याने वाहतूकदारांनी कापडगाठी वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पाली-जोधपूर कापडगाठी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अंदाजे सहाशे ट्रक कापड पडून राहिले आहे. परिणामी यंत्रमागधारकांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत असून इचलकरंजीच्या आर्थिक व्यवहारावर विपरीत परिणाम होत आहे. क्लॉथ मर्चंट असोसिएशन व वाहतूकदार कंपनी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही. याचा फटका सर्वसामान्य यंत्रमागधारकांना बसत आहे. पर्यायाने अडत्यास कमी दरात कापड विक्री करून स्वत:च्या कारखान्यातील कापडगाठींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होत आहे.यंत्रमाग व कापड यावर निर्भर असलेल्या इचलकरंजीचा हा मुख्य उद्योग आहे. उत्पादित झालेला माल संबंधित व्यापाऱ्यांना पोहोचला तर पुढच्या मालाचा उठाव होणार यासाठी वाहतूक दर योग्य तो ठरविण्यासाठी उत्पादक व वाहतूकदार यांच्यामध्ये समन्वय होणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी यड्राव, खोतवाडी, तारदाळ परिसरातील यंत्रमागधारकांनी पुढाकार घेतला आहे. प्रकाश तांबेकर, दीपक मगदूम, सचिन मगदूम ही मंडळी यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कमी दराने कापडाची विक्री कापड तागे उचल झाल्याशिवाय पेमेंट येत नाही. त्यामुळे सुताचे पैसे देता येत नाहीत. कापड उचल होत नसल्याने ते ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. यामुळे अडत्यांना कमी दरात कापड विक्री करून नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते वाहतुकीचा प्रश्न मिटल्यास सुटतील, असे यड्राव-खोतवाडी असोसिएशनचे प्रकाश तांबेकर यांनी सांगितले.