शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत सोनाराचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 00:59 IST

हल्लेखोर फरार : दुकानात घुसून हत्याराने डोक्यात वर्मी घाव

इचलकरंजी : शहरातील विकली मार्केटमध्ये एका सोनाराच्या दुकानात घुसून अज्ञाताने त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना रविवारी घडली. अनिल चंद्रकांत शिंदे (वय ३५, सध्या रा. पंत मळा, खानाज गल्ली) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेला. या खुनाची नोंद येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, विकली मार्केटच्या इमारतीत अनिल शिंदे यांचे परम गोल्ड नावाचे दुकान असून, या दुकानात सोन्या-चांदीचे टंच काढण्याचे काम केले जात असे. तसेच सोने व चांदी गाळून रिफाईन अशी कामे सुद्धा ते करत असत. मूळचे हेरवाड (ता. शिरोळ) येथील असलेले शिंदे गेली दोन वर्षे इचलकरंजीत राहत होते. रविवारी दुपारच्या सुमारास त्यांच्याकडे शहरातील एका सराफाकडून दोन कामगार सोने रिफाईन करण्यासाठी आले होते. दुकानात जाताच शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ताबडतोब ही घटना शेजारच्या दुकानदारांना सांगितली. तसेच याबाबत दूरध्वनीवरून शिवाजीनगर पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अनोळखी व्यक्तीने हातोडीसारख्या हत्याराने डोक्यात वर्मी घाव घातल्यामुळे ते गंभीररीत्या जखमी होऊन खाली पडले असावेत. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर मात्र तेथून पळून गेला. दुकानाच्या आतील बाजूस तयार करण्यात आलेल्या केबिनमध्ये खुनाचा हा प्रकार घडला. पोलिस आल्यानंतर खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी बाहेर पसरली. शिंदे यांच्याशी संबंधित व नातेवाइकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अज्ञात हल्लेखोराने जाताना मात्र लोखंडी कपाटात असलेल्या सोन्याच्या काही चीजवस्तू चोरून नेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून, हल्लेखोराचा अंदाज घेतला जात आहे. चोरी किंवा आर्थिक देवघेव यातून हा खून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी प्रथमदर्शनी वर्तविला आहे. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी व जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिस निरीक्षक सतीश पवार हे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)