शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
3
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
4
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
5
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
6
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
7
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
8
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
9
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
10
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
11
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
12
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
13
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
14
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
15
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
16
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
17
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
18
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
20
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !

इचलकरंजीत ‘कपबशी’चा घोळ

By admin | Updated: November 17, 2016 00:19 IST

एकच चिन्ह मिळाल्याने गोंधळ : नगराध्यक्षपदासाठी अपक्षाला कपबशी मिळाल्यामुळे अधिक संभ्रम

राजाराम पाटील --इचलकरंजी --येथील पालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना प्रभागनिहाय चिन्ह वाटपाच्या पद्धतीमुळे निवडणुकीतील त्रस्त विरोधी दोन आघाड्यांना २८ ठिकाणी कपबशी हे समान चिन्ह मिळाल्याने मोठा घोळ निर्माण झाला आहे. ताराराणी व राजर्षी शाहू अशा दोन आघाड्या जिल्हास्तरावर नोंदणीकृत असल्या तरी दोन्हीही आघाड्यांकडे ठरावीक चिन्हाचे आरक्षण नाही. त्यातच नगराध्यक्षपदाच्या एका अपक्ष उमेदवाराला सुद्धा कपबशीचे चिन्ह मिळाले असल्याने गोंधळात आणखीन वाढ झाली आहे.पालिकेच्या निवडणुकीसाठी पूर्वघोषित कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ११ नोव्हेंबर व चिन्ह वाटपासाठी १२ नोव्हेंबर या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या; पण नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी एका उमेदवाराचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला. त्यामुळे त्याने जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी होऊन त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. तसेच नगरसेवकपदासाठी ५ ब, ९ ब, १७ ब, २० ब, २५ ब व २८ ब या प्रभागांमध्ये सुद्धा वाद निर्माण झाल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्यांचेही निर्णय झाले; पण निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगराध्यक्षपदाबाबत ज्या नगरपालिकांमध्ये न्यायालयीन वाद निर्माण झाला आहे, त्यांच्यासाठी माघारीची मुदत पुढे ढकलण्यात आली. परिणामी इचलकरंजीमध्ये न्यायप्रविष्ट असलेल्या प्रभागात माघारीची मुदत मंगळवारी संपली आणि बुधवारी त्याबाबतचे चिन्ह वाटप करण्यात आले.ताराराणी आघाडीची युती भाजपबरोबर आहे, तर राजर्षी शाहू आघाडीची युती राष्ट्रीय व राष्ट्रवादी या दोन कॉँग्रेसबरोबर आहे. ताराराणी व शाहू या दोन्ही आघाड्यांना जिल्हास्तरावर नोंदणी असली तरी त्यांची चिन्हे आरक्षित नाहीत. या निवडणुकीमध्ये ताराराणी आघाडी नगरसेवकपदाच्या वीस जागा, तर शाहू आघाडी पंधरा जागा लढवीत आहेत. दोन्ही आघाड्यांकडील उमेदवारांनी अर्ज दाखल करताना प्रथम पसंतीचे चिन्ह म्हणून कपबशीची मागणी केली होती. नगरपालिकेच्या निवडणुकीतील चिन्ह वाटपावेळी प्रभागनिहाय चिन्ह वाटप करण्यात यावे, असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे प्रभागनिहाय चिन्ह वाटप करताना दोन्ही आघाड्यांकडील उमेदवारांनी समान चिन्हाची मागणी केल्यामुळे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. या चिठ्ठ्यांमध्ये ताराराणी आघाडीकडील उमेदवारांना सोळा ठिकाणी कपबशीचे चिन्ह मिळाले, तर दोन ठिकाणी किटली हे चिन्ह मिळाले आहे. त्याचबरोबर शाहू आघाडीकडील उमेदवारांना पंधरापैकी बारा ठिकाणी कपबशीचे चिन्ह मिळाले आणि एका ठिकाणी शिट्टी हे चिन्ह त्यांच्या पदरी पडले. अशा प्रकारे ताराराणी आणि शाहू या दोन्ही आघाड्या परस्परविरोधी पक्षाकडून उभ्या असल्या तरी दोन्ही आघाड्यांकडील उमेदवारांना कपबशी हे एकच चिन्ह मिळाले असल्यामुळे एकूणच त्या संबंधित प्रभागात प्रचार करताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांची चिन्ह पटवून देण्यासाठी भंबेरी उडाली आहे. अशा या गोंधळातच उमेदवार व त्यांच्या समर्थकांना प्रचार यंत्रणा चालविताना मतदारांकडून आपले चिन्ह चांगलेच घटवून घ्यावे लागणार आहे.उमेदवारीचा घोळ अंगलट आलाउमेदवारी अर्ज दाखल करताना परस्परविरोधी पक्षातून आघाड्या किंवा गट उभा राहणार असतील तर संबंधित आघाड्या व गटाकडील नेतेमंडळींकडून चिन्हाचा गोंधळ उडणार नाही, यासाठी सामंजस्य दाखवले जाते. दोन्ही बाजूंकडे एकच चिन्ह मिळावे, यासाठी चर्चा होऊन तसा निर्णय घेतला जातो. मात्र, इचलकरंजीमध्ये राजकीय पक्षाबरोबर युती करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मोठा घोळ सुरू होता. या गोंधळाच्या वातावरणात संबंधित आघाड्या - गटाकडील नेतेमंडळींना चिन्हाची आठवणच राहिली नाही आणि नेमका त्यावेळचाच घोळ आज अंगलट आला असल्याची चर्चा राजकीय जाणकारांत आहे.नगराध्यक्षपदासाठी सात, तर नगरसेवकपदासाठी २१८ उमेदवारइचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता नगराध्यक्षपदासाठी सात, तर ६२ नगरसेवकपदासाठी २१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी ४० उमेदवार राष्ट्रीय कॉँग्रेस, ८ उमेदवार राष्ट्रवादी कॉँग्रेस, १५ उमेदवार शाहू आघाडी, ३९ उमेदवार भाजप, २३ उमेदवार ताराराणी आघाडी, २४ उमेदवार शिवसेना, १ उमेदवार एमआयएम, ३ उमेदवार माकप, १ उमेदवार भाकप, १ उमेदवार जनता दल, २ उमेदवार भ्रष्टाचारविरोधी जनक्रांती, २ उमेदवार रासप, तर ६१ उमेदवार अपक्ष आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपा कॉँग्रेस, शिवसेना व एमआयएम यांचा प्रत्येकी एक व तीन अपक्ष उमेदवार उभे आहेत.आता निवडणूक प्रचारात गतीउमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून बहुतांश उमेदवारांनी आपला प्रचार घरोघरी जाऊन सुरू केला आहे. त्यापैकी राजकीय पक्षांची चिन्हे निश्चित असल्याने या पक्षांकडील उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे; पण चिन्ह नसलेल्या उमेदवारांना प्रचाराची अडचण निर्माण झाली होती. आता अपक्षांसह सर्वच राजकीय पक्ष, आघाड्यांकडील उमेदवारांना चिन्हे मिळाल्यामुळे आजपासून निवडणूक प्रचारात गती निर्माण होईल.