शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत छेडछाडीने मुली हैराण

By admin | Updated: June 30, 2016 01:07 IST

कोपऱ्या-कोपऱ्यांवर टोळकी : पोलिसांकडून जरब बसविण्याची मागणी

इचलकरंजी : इचलकरंजी शहरात शाळकरी मुली व महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. शहरातील काही ठरावीक ठिकाणी टोळक्यांनी अड्डे बनविल्याने मुली त्रस्त झाल्या आहेत. पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक व शाळांच्या शिक्षकांकडून होऊ लागली आहे.कोल्हापूर येथील बोंद्रेनगरातील पल्लवी बोडेकर हिने छेडछाडीला कंटाळून केलेली आत्महत्या आणि इचलकरंजीतील पारीक कॉलनीत मुलीच्या दारात टोळक्याने रात्री घातलेला हैदोस या घटनांमुळे मुलींच्या छेडछाडीचा आणि एकतर्फी प्रेमातून सतावण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इचलकरंजीत हायस्कूल व महाविद्यालयांची संख्या लक्षणीय असून, आसपासच्या खेडेगावांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येतात. हायस्कूल किंवा महाविद्यालयांशी काहीही संबंध नसलेली टोळकी परिसरात उभी असतात. शाळा भरण्याच्या वेळी किंवा शाळा सुटण्याच्या वेळी अचूकपणे वेळ पाळणाऱ्या आणि मुलींची छेड काढणाऱ्या या टोळक्यांची दांडगाई वाढली आहे. मुली जवळ येताच चित्रविचित्र आवाज काढणे, चित्रपटांतील प्रसिद्ध गाण्यांवर हावभाव करणे किंवा काही ठरावीक अभिनेत्रींच्या नावाने मोठ्याने हाका मारणे, असे प्रकार केले जात आहेत.अशा प्रकारांबाबत शाळेत शिक्षकांना किंवा नातेवाइकांना सांगितले तर घरातील मंडळी सोडण्यासाठी शाळेपर्यंत येतात. त्यामुळे वादावादीच्या घटना होण्याची भीती असते. तसेच अशा घटनांमुळे कदाचित शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागेल, अशीही भीती वाटत असल्याने मुली नातेवाइकांकडे त्याबाबत कोणतीही वाच्यता करीत नाहीत. त्याचप्रमाणे शाळेमध्ये शिक्षकांनाही सांगितले जात नाही. यातूनच सडकसख्याहरी टोळक्यांची मुजोरी वाढली आहे. इचलकरंजी शहरात अशी नेमकी ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी ते सडकसख्याहरी उभे राहिलेले आढळतात. त्यामध्ये जुने शिवाजीनगर पोलिस ठाणे, झेंडा चौक, नारायण टॉकीज परिसर, शाहू पुतळा ते जुना कोल्हापूर नाका, विक्रमनगरमधील काही भाग, शहापूर आगार परिसर, जय सांगली नाका, आदी ठिकाणांचा समावेश आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला पोलिसांनी संबंधित परिसरांमध्ये गस्त ठेवावी. त्याचबरोबर काही महिला पोलिसांची समावेश असलेली पथके नेमून त्या टोळक्यांवर अचानकपणे वारंवार कारवाई करावी. ज्यामुळे या सडकसख्याहरी टोळक्यांना जरब बसेल, अशी मागणी पालक व शिक्षकांतून होत आहे. (प्रतिनिधी)सडकसख्याहरींना पालकांसमक्ष समज द्यावीटोळक्यांवर कारवाई करताना पकडलेल्या सडकसख्याहरींना पोलिस ठाण्यामध्ये नेऊन तेथे त्यांच्या पालकांना बोलावून पालकांसमक्ष त्यांना समज देण्यात यावी. असा प्रकार कोल्हापूर येथील राजवाडा पोलिसांनी केला होता. त्यामुळे अशा टोळक्यांना आळा बसेल, अशीही चर्चा पालकांमध्ये आहे.