इचलकरंजीत बंगला फोडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास
By admin | Updated: May 6, 2014 18:25 IST
* परिसरातील आणखी एका घरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न* चोर्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण(फोटो)०६०५२०१४-आयसीएच-०१इचलकरंजी : येथील खंजिरे औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या हनुमाननगरातील बंगला फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याच परिसरात आणखीन एका घरातही चोरीचा प्रयत्न ...
इचलकरंजीत बंगला फोडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास
* परिसरातील आणखी एका घरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न* चोर्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण(फोटो)०६०५२०१४-आयसीएच-०१इचलकरंजी : येथील खंजिरे औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या हनुमाननगरातील बंगला फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याच परिसरात आणखीन एका घरातही चोरीचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. खंजिरे वसाहतीतील हनुमाननगरात केदार मारुती पाटील (वय २९) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. सोमवारी ते परगावी गेले होते. आज (मंगळवार) सकाळी दूध विक्रेता तेथे आल्यानंतर त्याला बंगल्याचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पाटील यांना चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश करून आतील दोन बेडरूममध्ये असलेल्या दोन्ही तिजोरी फोडून त्यातील साहित्य विस्कटून सात तोळे सोन्या-चांदीचे दागिने व १५०० रुपये रोख रकमेची चोरी केली. यामध्ये बोरमाळ, पाटल्या, नेकलेस, अंगठ्या, चेन, ब्रेसलेट या दागिन्यांचा समावेश आहे.चोरीची घटना समजताच गावभाग पोलिसांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांसह परिसराची पाहणी केली. चोरी केलेल्या रूममध्ये विटा आढळून आल्या. कदाचित अचानक कोणी आल्यास विटाने त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्याचा वापर केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्याचबरोबर त्या परिसरात बजरंग बबन संकपाळ हे भाड्याने राहतात. त्यांच्याही घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून आतील बॅगा फोडून त्यातील साहित्य विस्कटून टाकले होते. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. तसेच तेथे दारूच्या बाटल्याही आढळल्या. त्यामुळे चोरटे काही काळ तेथे दारू पीत बसल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इ. वाय. पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)(फोटो ओळी)इचलकरंजीतील हनुमाननगर परिसरातील केदार पाटील यांच्या बंगल्यातील कपाटे फोडून त्यातील साहित्य विस्कटून टाकल्याचे छायाचित्र.(छाया : साईनाथ)