शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

इचलकरंजीत संतप्त महिलांचा हल्लाबोल

By admin | Updated: January 7, 2017 01:18 IST

मायक्रो फायनान्स कार्यालयांची मोडतोड : कर्मचाऱ्यांना धरले धारेवर; चप्पल, बूट, फायली भिरकावल्या

इचलकरंजी : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील संगीता काटे या महिलेच्या आत्महत्येचे पडसाद शुक्रवारी इचलकरंजीत उमटले. शहरातील दोन मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयावर मनसे महिला मंडळ व बचत गटाच्या महिलांनी हल्ला केला. यामध्ये कॉम्प्युटर, टीव्ही, खुर्च्या, टेबल यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. तेथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. शंभर ते दीडशे महिलांच्या जमावाने केलेल्या हल्ल्याने खळबळ उडाली.रेंदाळ येथील संगीता काटे यांनी एका मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. यंत्रमाग व्यवसायातील मंदी व नोटाबंदी या कारणांमुळे आर्थिक उलाढाल मंदावल्याने कर्जाचे हप्ते भरण्यास विलंब झाला. मात्र, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कर्जाच्या हप्त्यासाठी दररोज तगादा लावला जात होता. दिवस-दिवसभर हे कर्मचारी कर्ज वसुलीच्या नावाखाली घरात बसून राहत होते. या त्रासाला कंटाळून संगीता यांनी गुरुवारी आत्महत्या केली, असे संगीताच्या नवऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील जनलक्ष्मी फायनान्स कंपनी (भाग्यरेखा टॉकीजजवळ) व ऐक्विटास स्मॉल फायनान्स कंपनी (दाते मळा) या दोन्ही कंपन्यांवर बचत गटाच्या महिला व मनसेच्या पदाधिकारी महिलांनी एकत्रित हल्ला चढविला. तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारत त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी झालेल्या वादविवादानंतर महिलांनी रौद्ररूप धारण केले. चपला, बूट फेकून मारत कार्यालयातील फायली भिरकावल्या. टेबल, खुर्च्या, टीव्ही, कॉम्प्युटर यांसह अन्य साहित्यांची तोडफोड केली.महिलांच्या जमावाने घातलेल्या धुडगुसामुळे शहरातील मायक्रोफायनान्स कंपनीसह सावकारांचे धाबे दणाणले आहेत. शहरात डझनभर मायक्रोफायनान्स कंपन्या असून, कर्जपुरवठ्याच्या नावाखाली महिला बचत गटांना साखळीमध्ये कर्ज देऊन एखादी महिला कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असेल, तर साखळीतील अन्य महिलांकडून जादा रक्कम घेऊन त्या महिलेचेही कर्ज वसूल केले जाते. त्यामुळे नाईलाजास्तव महिला या फासात अडकत जातात, असे आरोपही यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)वसुलीसाठी दमदाटीसंतप्त झालेल्या महिलांच्या भावना तीव्र होत्या. वसुलीच्या नावाखाली महिलांना घरी जाऊन दमदाटी केली जाते. घरातील भांडी गोळा करतो, सोने गहाण ठेवा आणि आमचे कर्ज भागवा; अन्यथा आत्महत्या करा, असे बोलले जाते. या प्रकारामुळे महिला धास्तावल्या असून, आत्महत्येसारखे विचार मनात येत आहेत. त्यातूनच संगीता यांनी आत्महत्या केली, असा आरोप केला.