शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत कचराप्रश्नी उद्रेक

By admin | Updated: September 18, 2016 01:11 IST

पाच तास तणाव : मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मृत डुकरे टाकली; आंदोलकांना घेतले ताब्यात; आंदोलक, प्रशासनाचा मोर्चा-प्रतिमोर्चा

इचलकरंजी : तीन ते चार महिन्यांपासून शहरातील कचरा उठाव व स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या नागरिकांचा शनिवारी उद्रेक झाला. नगरसेविका मंगल मुसळे व त्यांचे पती बंडोपंत मुसळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी एका ट्रॉलीतून आणलेली मृत डुकरे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या दालन, टेबल व आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कार्यालयाच्या दारात टाकलीे. आणलेला कचरा पालिकेच्या प्रवेशद्वारात ओतला. या प्रकाराने नगरपालिकेत सर्वत्र दुर्गंधी पसरली.अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे नगरपालिकेत खळबळ माजली. हा प्रकार नगरपालिकेतील सर्व विभागांत समजताच कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन काम बंद आंदोलन केले. मुख्याधिकारी डॉ. रसाळ, उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून बंडोपंत मुसळे यांच्यासह पंधराजणांना ताब्यात घेतले . तर बंडोपंत मुसळे यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या वादग्रस्त कामाची चौकशी करण्याचा तक्रारी अर्ज दिला. दरम्यान मुसळेंसह आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे समजताच दत्तनगर व गणेशनगर परिसरातील नागरिकांनी नगरसेविका मंगल मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चाच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासन यांचा निषेध नोंदविला. असा हा गोंधळ सुमारे पाच तास सुरू होता.गणेशनगर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ते व गटारी यांची साफसफाई झालेली नाही. ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलला नसल्याने त्या-त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून मृत झालेली डुकरे नगरसेविका मंगल मुसळे व त्यांचे पती बंडोपंत यांनी पालिकेला कळवूनसुद्धा ती उचलण्यात आली नव्हती. अशा प्रकारांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मुसळे यांच्यासह पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी येताना एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये कचरा व मृत झालेली तीन डुकरे नगरपालिकेत आणली. ट्रॉलीतील कचरा पालिकेच्या प्रवेशद्वारातच टाकला.त्यानंतर एक डुकर आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कार्यालयाच्या दारात टाकले. आणि या आंदोलनकर्त्यांनी राहिलेली दोन डुकरे घेऊन आपला मोर्चा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाकडे वळविला. त्यातील एक डुकर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात टाकले, तर एक डुकर मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले. अचानक घडत असलेला हा प्रकार पाहून मुख्याधिकारी डॉ. रसाळ खुर्चीवरून उठले. आणि त्यांनी मुसळे यांना संबोधत आंदोलनाची पद्धत चुकीचे असल्याचे सुनावले. तेव्हा मुसळे व मुख्याधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी शिवराळ आरोपांचा वापर करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यातच उर्वरित आंदोलनकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार करीत मुख्याधिकाऱ्यांना भंडावून सोडले. परिणामी, दालनातील वातावरण तंग बनले.नगरपालिका कार्यालयात सुटलेली दुर्गंधी आाणि घडलेला प्रकार समजताच पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र आले. घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत काम बंद आंदोलन सुरू केले. कामगारांच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह एकत्र येऊन नगरपालिकेचे प्रवेशद्वार बंद केले. अशा प्रकारचे आंदोलन, उडालेला गोंधळ हा प्रकार सुमारे दोन तास सुरू होता. प्रवेशद्वारात एकत्र आलेल्या कामगार संघटनांनी झालेल्या प्रकाराचा निषेध करीत पालिका कार्यालय बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला. त्याचप्रमाणे कार्यालयात टाकलेली डुकरे आंदोलनकर्त्यांनीच उचलावीत, अशी भूमिका घेतली. त्यामुळे वातावरणातील तणावात आणखीनच भर पडली. मृत डुकरांमुळे सुटलेल्या दुर्गंधीमुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचारी तोंडाला रुमाल बांधून वावरत होते.दरम्यान, पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह आलेल्या पोलिसांनी मुसळे यांच्यासह अन्य मोर्चेकरी आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच मुख्याधिकारी डॉ. रसाळ, उपमुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर चालत जाऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदविला. त्याठिकाणी असलेल्या पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्याकडे आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान बंडोपंत मुसळे यांच्यासह पंधराजणांना ताब्यात घेतल्याची माहिती समजताच दत्तनगर व गणेशनगर परिसरातील महिला व पुरुष नागरिकांनी नगरसेविका मंगल मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चाच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासन यांचा निषेध नोंदविला. (प्रतिनिधी)समझोत्याचा प्रयत्नहा गोंधळ घडत असतानाच माजी आमदार अशोकराव जांभळे, सागर चाळके, बांधकाम समितीचे सभापती लतीफ गैबान, नगरसेवक भाऊसाहेब आवळे, प्रकाश मोरबाळे, आदींनी पालिका प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी तक्रार देण्याची भूमिका कायम ठेवली.