शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

मला अध्यक्ष करून चूक केल्यासारखे वाटेल

By admin | Updated: August 9, 2016 00:24 IST

चंद्रकांतदादा पाटील : विवेकानंद संस्थेने विविध अभ्यासक्रमांची निर्मिती करावी

कोल्हापूर : काही संस्थांमध्ये अध्यक्ष हे येऊन केबिनमध्ये बसून चहा पिऊन जातात; पण मी असा अध्यक्ष नाही. विवेकानंद शिक्षण संस्थेला विकासाच्यादृष्टीने जे उद्दिष्ट, ध्येय देईन, त्याच्या पूर्ततेसाठी येत्या तीन वर्षांत संस्थेतील प्रत्येक घटकाला माझ्या गतीने काम करावे लागेल. त्यामुळे मला अध्यक्ष करून चूक केल्यासारखे वाटेल, असे प्रतिपादन पालकमंत्री व संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे केले.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या २९ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विवेकानंद महाविद्यालयातर्फे आयोजित डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनातील कार्यक्रमास ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास मी तयार नव्हतो पण, कार्याध्यक्षांनी वारंवार आग्रह केल्यानंतर अखेर पद स्वीकारले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे कार्य हे दीपस्तंभासारखे सर्वांना मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे. कार्यक्रमात दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंतांचा आणि शाहीर भूषण पुरस्कारप्राप्त कुंतिनाथ करके यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेची निकाल संकलन व संस्था मूल्यांकन, आदी पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्राचार्य हिंदुराव पाटील, डॉ. शरदचंद्र साळुंखे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाराम शिपुगडे, माणिक पाटील-चुयेकर आदी उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव डॉ. अशोक करांडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी आभार मानले. दरम्यान, कार्यक्रमापूर्वी प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. (प्रतिनिधी)