शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बालनाट्य स्पर्धेत ‘आता आमी शाळंला जाणार’ प्रथम

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

गटस्तरीय बालनाट्य महोत्सव : अभिनयात मुलांत साळुंखे, तर मुलींत मंजद प्रथम

कोल्हापूर : गटस्तरीय बालनाट्य महोत्सवामध्ये कामगार केंद्र तासगाव (जि. सांगली)च्यावतीने सादर केलेल्या ‘आता आमी शाळंला जाणार’ या बालनाट्याने प्रथम क्रमांक, तर कामगार केंद्र माडगुळे (ता. सांगली)च्या ‘असा घडला शिवबा’ व मांजर्डे (ता. सांगली) केंद्राच्यावतीने सादर केलेल्या ‘स्त्री भू्रणहत्या’ या नाटकास तृतीय क्रमांक मिळाला.महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कोल्हापूरच्यावतीने बुधवारी इंदिरासागर हॉल, संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या बालनाट्य महोत्सवात सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील कामगार कल्याण मंडळांचे १२ संघ सहभागी होते. या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तासगाव, माडगुळे, मांजर्डे या केंद्रांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले, तर कोल्हापुरातील फुलेवाडी कामगार केंद्राने सादर केलेल्या ‘पर्यावरण रक्षण-काळाची गरज’ या, तर कुंडल (सांगली)च्या ‘हम सब एक हैं’ या नाटकास उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल मेघा कुलकर्णी (असा घडला शिवबा) या नाटकास प्रथम, तर भागवत खुळेकर यांना द्वितीय (आता आमी शाळंला जाणार), महेश शेटे यांना (स्त्री भू्रणहत्या)च्या दिग्दर्शनाबद्दल तृतीय क्रमांक मिळाला.बक्षीस समारंभ हुतात्मा वारके सूतगिरणीचे कार्यकारी संचालक मिलिंद कुलकर्णी व शिवाजी विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचे प्रा. विजय पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर गट कार्यालयाचे कामगार अधिकारी संभाजी पवार, परीक्षक कपिल मुळे, किरण चव्हाण, राज पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघसेन जगतकर, राजेंद्र निकम, चंद्रकांत घारगे, अरुण लाड, पीयूष पाटील, महेश रसाळ, आदींनी परिश्रम घेतले.+++उत्कृष्ट अभिनयमुले - सोमनाथ साळुंखे - ‘आता आमी शाळंला जाणार’ यामधील ‘विट्या’च्या भूमिकेबद्दल, तर विश्वराज पाटील याला ‘हम सब एक हैं’मधील ‘पंजाबी’च्या भूमिकेबद्दल द्वितीय आणि आशिष खांडेकर याला ‘स्वराज्य प्रतिज्ञा’ या नाटकातील ‘शिवाजी’ या भूमिकेबद्दल तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. मुलींमध्ये सुजाता मंजद हिला ‘स्त्रियांवरील अत्याचार’ या बालनाट्यातील सासूच्या भूमिकेबद्दल प्रथम, तर ऋचा जोशी हिला ‘असा घडला शिवबा’ या नाटकातील ‘शिवाजी’ या भूमिकेबद्दल आणि सुहाना चौगुले हिला ‘मोरू माली दमाल रिटर्न’ या नाटकातील ‘मास्तर’च्या भूमिकेबद्दल तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.