शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मी इच्छुक आहे, तुमची मदत हवी..!

By admin | Updated: November 8, 2015 00:07 IST

विधानपरिषदेचे रणांगण : सतेज पाटील यांच्या भेटीगाठी

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मी इच्छुक आहे. तुमची मदत हवी आहे, असे आवाहन करीत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीचा थेट प्रचारच सुरू केला आहे. आज, शनिवारी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोल्हापूर महापालिकेतील मतांचा गठ्ठा कायमच निर्णायक ठरत आला आहे. आमदार महादेवराव महाडिक हे महापालिकेतील किमान ५० मते पाठीशी घेऊनच मैदानात उतरत. त्यामुळे त्यांच्या मतांची मोजणी ५१ पासून होई. या लढतीत ते विजयी होण्याचे तेच महत्त्वाचे कारण असे. यंदाही त्यांनी ताराराणी आघाडीची स्वतंत्र चूल मांडण्यामागे हेच राजकारण आहे. त्यामुळेच सतेज पाटील यांनीही महापालिकेचा निकाल लागेपर्यंत आपले पत्ते खुले केले नव्हते. आता तिथे काँग्रेसला २७ जागा मिळाल्यावर त्यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार हा या लढतीतील कळीचा मुद्दा आहे. परंतु, उमेदवारीबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून काहीतरी ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय पाटील प्रचाराला लागणार नाहीत, असेही सांगण्यात येत आहे. पाटील यांनी शनिवारी सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची त्यांच्या राजारामपुरीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व या निवडणुकीत आपण मला सहकार्य करावे, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी दुपारी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र यड्रावकर, काँग्रेसचे गणपतराव पाटील, सायंकाळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांची वारणानगरला जाऊन भेट घेतली. शुक्रवारी (दि. ६) त्यांनी आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्यांची भेट घेतली होती. आज, रविवारी त्यांचा गडहिंग्लज व इचलकरंजी दौरा आहे. या दौऱ्यात ते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांना भेटणार आहेत. (प्रतिनिधी)