शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ओळख माझी माझ्याशी...

By admin | Updated: July 18, 2014 00:28 IST

व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम

कोल्हापूर : तुम्ही करिअर वुमन असा, किंवा होम मेकर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा नव्याने शोध घेण्याची संधी सोमवारी (दि. २१) दुपारी बारा ते तीन या वेळेत कोरगावकर लॉन, टाकाळा येथे लोकमत सखी मंच, ‘ओळख माझी माझ्याशी’ या कार्यक्रमातून महिलांना उपलब्ध करून देत आहे. ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातील तारे-तारका सखींच्या भेटीला येणार असून, व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स देणार आहेत. गोविंदराव कोेरगावकर धर्मादाय संस्था यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे.घर आणि करिअरची कसरत कशी साधायची, घरात राहूनही स्वत:ला आधुनिक कसे बनवायचे, नात्यांना न्याय कसा द्यायचा, वेळेची सांगड कशी घालायची, छंद कसे जोपासायचे, अशा विविध मुद्द्यांवर वारणा वडगावकर हसत-खेळत मार्गदर्शन करणार आहेत. महिलांसाठी काही उद्बोधक खेळही त्या घेणार आहेत. यावेळी होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. श्रीकांत लंगडे महिलांशी हितगूज साधतील.‘पोस्टर बॉईज’या चित्रपटातील तारे श्रेयस तळपदे, दीप्ती तळपदे, दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव, नेहा जोशी, पूजा सावंत आणि प्रसिद्ध गायिका बेला शेंडे सखी सदस्यांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार असून, हॉटेल करवीर रियासतकडून दोन कुटुंबीयांना डिनर कुपन, तर उत्कृष्ट शिबिरार्थीला भेटवस्तू मिळणार आहेत. सखींनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)