शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

यायला लागतंय... नव्हे, यायचंच...!

By admin | Updated: October 13, 2016 02:07 IST

नवनवीन घोषणांचा उदय : क्रांती मोर्चाच्या डिजिटल फलकांनी शहर ‘मराठा’मय

संतोष तोडकर -कोल्हापुरात शनिवारी निघणाऱ्या भव्य मराठा मोर्चात सहभागी होण्याबाबत आवाहन करणाऱ्या डिजिटल फलकांनी सारे शहर मराठामय झाल्याचे दिसून येत आहे. ‘यायला लागतंय.... नव्हे, यायचंच...!’ या कोल्हापुरी निरोपाचे फलक चौकाचौकांत दिसत आहेत. शहरातील शिवाजी चौक, बिंदू चौक, पापाची तिकटी, मिरजकर तिकटी, गंगावेश, रंकाळा वेश, राजारामपुरी, शाहूपुरी, साने गुरुजी वसाहत, वाशी नाका, शिवाजी पेठ, तावडे हॉटेलचा परिसर, कळंबा रोड, उद्यमनगरसह जवळजवळ सर्वच भागांतील तरुण मंडळे, ग्रुप्स, तालीम मंडळे, संघटनांनी मोर्चाच्या समर्थनार्थर् ंडिजिटल फलक लावले आहेत. क्रांती मोर्चाच्या दसरा वॉर रूममधून ‘भावांनो... यायला लागतंय’, ‘इतिहास घडविण्यासाठी मराठ्यांनो एकत्र या..!,’, ‘आता मराठा गप्प बसणार नाही’, ‘आम्ही जिजाऊंच्या लेकी, अन्यायाविरुद्ध झाली आमची एकी’, ‘उठा मराठ्यांनो उठा... जागे व्हा! सामील व्हा’, ‘मी येणार, तुम्ही पण या’, ‘मराठ्यांनो उठा, जागे व्हा, आता नाही तर कधीच नाही.. लई केलं इतरांसाठी, आता फक्त मराठा समाजासाठी’, ‘तख्तासाठी विखुरलेला मराठा रक्तासाठी एकत्र येणार’, ‘आजवर लढलो मातीसाठी, एक लढा जातीसाठी’ या घोषणा निश्चित केल्या आहेत. जिल्ह्णातील विविध तालुके, गावांमधून तसे फलक झळकू लागले आहेत. विविध तालीम मंडळे, ग्रुप्स, मंडळांतील कार्यकर्त्यांच्या कल्पकतेतून ‘नका ठेवू वाईट नजरा जिजाऊंच्या लेकींवर.. पेटून उठेल महाराष्ट्र सारा मराठ्यांच्या एकीवर’, ‘अन्यायाविरुद्ध करूया बंड... कोपर्डीच्या गुन्हेगारांना मिळालाच पाहिजे मृत्युदंड’, ‘मरहट्टा मराठा, मेल्यावरच हटणार मराठा,’ ‘यायला लागतयंच’, ‘प्रक्षुब्ध मनाचा नि:शब्द हुंकार’, ‘महाराज लढले हिंदवी स्वराज्यासाठी... आपण लढूया आपल्या हक्कांसाठी’, ‘आमच्या मराठ्यांचं कसं असतं... आम्ही सगळे कुठे जात नाही.. आणि गेलो तर मोजता पण येत नाही’, ‘तलवारीचे घाव अन् मराठ्यांचे नाव... एकदा कोरले की कोरलेच... मग इतिहास असो की शत्रूचा श्वास’, ‘आमची शांतता तुम्हाला दहशत वाटत असेल तर विचार करा, आमची दहशत कशी असेल’ अशा घोषणांनी गल्लीबोळ मराठामय झाले आहेत.घोषणांची कल्पकता क्रांती मोर्चाच्या दसरा वॉर रूममधून तरुणाई कल्पकता पणाला लावत आहे. नवनवीन घोषवाक्ये, कवितांचा अक्षरश: पाऊस पडत आहे.