शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

सदाभाऊंची घराणेशाही मला मान्य नाही : शेट्टी

By admin | Updated: February 14, 2017 00:56 IST

संघटनेने ठरविले तर राज्यमंत्रिपद सोडावे लागेल

कोल्हापूर : गेली पंधरा वर्षे ‘शेतकरी संघटनेचा नेता’ म्हणून दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाहीविरुद्ध आम्ही डंका पेटविला आणि माझाच सहकारी पुन्हा त्याच वाटेने जाणार असेल तर ते माझ्या ‘इथिक्स’मध्ये बसत नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. लातूर येथे ते एका खासगी दूरचित्रवाहिनीशी बोलत होते. त्यानंतर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हीच भूमिका पुन्हा स्पष्टपणे मांडली.कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हा सांगली जिल्ह्यातील बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद मतदारसंघातून रयत विकास आघाडीतून निवडणुकीस उभा आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता शेट्टी म्हणाले, ‘काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाहीविरुद्ध मी गेली पंधरा वर्षे डंका पेटवत आहे. आता ही सर्वच पक्षांतील अनेक नेत्यांची पोरंटोरं या निवडणुकीत उभी आहेत. नेत्यांनीच आपल्या पोरांना निवडणुकीत उभे केले तर पक्षासाठी, संघटनेसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, असा माझा सवाल आहे. त्यामुळे सदाभाऊंनी मुलाला निवडणुकीत उभे केले हे मला पटलेले नाही. काही ‘इथिक्स’ पाळून मी राजकारण करतो. त्यामध्ये हे माझ्या मनाला हे पटत नाही. सदाभाऊंनी आपल्या मुलाला उमेदवारी देऊन पक्षात घराणेशाही आणली. सत्तेचा मोह चांगला नाही. तो वेळीच आवरला नाही तर सदाभाऊंचा पाशा पटेल होईल.’खासदार शेट्टी म्हणाले,‘राज्यातील सरकारबद्दल लोकांत अस्वस्थता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे बदलतील की काय अशी शक्यता वाटत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे मत प्रदर्शित होईल त्यावर भविष्यातील राजकारणाची दिशा निश्चित करू. आम्ही नेहमीच जनमताचा आदर केला आहे. त्यामुळे निकालाचे चिंतनही आम्ही जरूर करू. राज्यातील लोकशाही आघाडीचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी काही तात्त्विक मतभेद असतानाही त्यावेळी भाजपसोबत गेलो; परंतु हे सरकारच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार नसेल तर त्या अस्वस्थेचीही दखल घ्यावी लागेल. सदाभाऊ हे संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांना राज्यमंत्रि-पदाची संधी दिली. त्यामुळे संघटनेने सत्तेबाबत वेगळा निर्णय घेतला तर तो त्यांनाही मान्य करावा लागेल.’