शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आई बनली लेखणी..‘ओंकार’ची यशाला गवसणी

By admin | Updated: June 9, 2015 03:23 IST

‘सेरेब्रल पाल्सी’ने आजारी असलेल्या येथील ओंकार मकरंद देशमुख याने आई अंजली यांच्या साथीने दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळविले.

कोल्हापूर : ‘सेरेब्रल पाल्सी’ने आजारी असलेल्या येथील ओंकार मकरंद देशमुख याने आई अंजली यांच्या साथीने दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळविले. पराकोटीचे अपंगत्व असतानाही ओंकारने जिद्दीने मिळविलेले यश छोट्या-छोट्या गोष्टींसाठी निराश होणाऱ्या सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे.ओंकार हा ‘सेरेब्रल पाल्सी’ या विकाराने त्रस्त आहे. तो जे काही बोलतो, ते केवळ त्याच्या आई-वडिलांनाच समजते; त्यामुळे त्याने दहावीची परीक्षा द्यायची कशी, अशी अडचण निर्माण झाली होती. कारण त्याला स्वत:ला तरी लिहिता येत नाही व तो जे सांगतो ते इतरांना समजत नाही. आईला लेखनिक म्हणून देण्याची तरतूद नव्हती. मुलाने दहावीची परीक्षा द्यावी यासाठी पालक प्रयत्नशील होते. अखेरचा पर्याय म्हणून कुटुंबीयांनी ओंकारच्या लेखनिक (रायटर) म्हणून त्याच्या आर्इंना परवानगी द्यावी, अशी मागणी लेखी पत्राद्वारे शिक्षण मंडळाकडे केली. ओंकारची स्थिती लक्षात घेऊन, त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘विशेष बाब’ म्हणून राज्य शासनाने त्याची आई अंजली यांना परीक्षेत लेखनिक म्हणून परवानगी दिली. शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे ओंकारला दहावीची परीक्षा देता आली. या संधीचे सोने करण्याची किमया ओंकारने जिद्दीने केली. आपण परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याला झालेला आनंद शब्दांत मांडता येत नाही. त्याने या आनंदाप्रीत्यर्थ वाटलेल्या पेढ्यांनाही वेगळाच सुगंध होता. मुलाचे यश पाहून आईचेही डोळे आनंदाश्रूंनी डबडबले. ओंकार हा ‘लोकमत’ कोल्हापूरचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांचा मुलगा आहे. त्याच्या यशात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा कोल्हापूर विभाग, कोल्हापुरातील दादासाहेब मगदूम हायस्कूल आणि औरंगाबादमधील महाराष्ट्र हिंदी विद्यालयाचे योगदान महत्त्वाचे ठरल्याची प्रतिक्रिया ओंकारच्या आई अंजली यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)------------प्रेरणादायी...! कोल्हापुरातील ओंकार देशमुख या ‘सेरेब्रल पाल्सी’ने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सत्तर टक्के गुण मिळविले. निकालानंतर सोमवारी त्याने हा आनंद आई अंजलीसमवेत असा साजरा केला.