शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भाकरी मीच थापतोय; परतायची कधी हे चांगले कळते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघात यापूर्वी आणि आताही मीच भाकरी थापतोय, त्यामुळे ती कधी परतायची हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघात यापूर्वी आणि आताही मीच भाकरी थापतोय, त्यामुळे ती कधी परतायची हे मला चांगले कळते. संघाची काळजी करण्यास आम्ही समर्थ असल्याचा पलटवार ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी विरोधी संचालक शौमिका महाडिक यांच्यावर केला.

‘गोकुळ’ची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. संघाची सभेवेळी विरोधी संचालक बाळासाहेब खाडे, अंबरीष घाटगे, चेतन नरके हे वेळेवर उपस्थित राहिले होते. मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील आल्यानंतर अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविकास सुरुवात केली. संघाचे गेल्या आर्थिक वर्षासह आगामी योजनांची माहिती देत असताना, विरोधी संचालिका शौमिका महाडिक तिथे आल्या. महाडिक यांना पाहून अध्यक्ष पाटील यांच्या बोलण्याचा रोखच बदलला. शौमिका महाडिक यांनी गुरुवारी केलेल्या आराेपाचा समाचार घेण्यास सुरुवात केली. संघावर ८२ कोटींच्या कर्जाचा आकडा कोणी काढला, संघाची काळजी करण्यास आम्ही समर्थ आहोत. सकाळीच एकाचा फोन आला, भाकरी परतणार की नाही? असे विचारले. मागील संचालक मंडळात आणि आताही मीच भाकरी थापतोय, त्यामुळे भाकरी केव्हा परतायची, हे मला चांगले माहिती आहे. कोणी काळजी करू नये, असे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

चार महिन्यांचा नव्हे, ३५ वर्षांच्या कारभारावर विश्वास

‘गोकुळ’ला आज ‘एनडीडीबी’सह इतर वित्तीय संस्था कर्ज देण्यास तयार आहेत, हा संघावरील विश्वास आहे. हा विश्वास चार महिन्यांत नव्हे, तर गेली ३०-३५ वर्षे केलेल्या कामकाजामुळेच असल्याचा टोला शौमिका महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

लेखापरीक्षणात ठपके नाहीत म्हणजे चांगला कारभार

लेखापरीक्षण अहवालात कोणत्याही प्रकारचे ठपके नाहीत, म्हणजे ‘गोकुळ’चा मागील कारभार चांगलाच होता, हे सिध्द होते. यापुढेही असाच रहावा, असा टोला महाडिक यांनी लगावला.

महाडिक यांचा मुश्रीफ यांना नमस्कार

शौमिका महाडिक आल्यानंतर व्यासपीठावर बसलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहून त्यांनी नमस्कार केला. मंत्री मुश्रीफ यांनीही त्यांना नमस्कार केला. मात्र पालकमंत्री सतेज पाटील व महाडिक यांनी एकमेकांकडे ढुंकूनही पाहिले नाही.