पट्टणकोडोली ग्रामपंचायत कार्यालयात एका विषयावर चर्चा रंगली होती. या चर्चेवेळी काही सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि एक ठेकेदार उपस्थित होते. यावेळी तेथे प्रभाग क्रमांक तीनमधून निवडून आलेल्या एका महिला सदस्याचा पतीही उपस्थित होता. चर्चा सुरू असताना या पती सदस्याने अचानक उठून संपूर्ण गावालाच अश्लील शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. यापूर्वीही त्याने शिव्यांची लाखोली वाहण्याचा असा अनेक वेळा विचित्र प्रकार केला आहे, तर महिलेची छेड काढल्याप्रकरणी तो वादग्रस्तही ठरला आहे. हा प्रकार झाल्यानंतर या घटनेची पोस्ट सोशल मीडियावर वायरल केली. यावेळी अनेकांनी या सदस्याला सोशल मीडियावर खडे बोल सुनावले. या पती सदस्याच्या बद्दल ग्रामस्थांकडून मात्र प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
पट्टणकोडोलीत सदस्याच्या पतीने गावाचा केला उद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST