शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

हुपरीची सामाजिक बांधीलकी धोक्यात

By admin | Updated: November 24, 2014 23:05 IST

ऊठसूट बंद : मूठभर हुल्लडबाज तरुण

तानाजी घोरपडे - हुपरी --सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी विसरलेले सामाजिक बांधीलकीचे भान, लोप पावत चाललेल्या सामाजिक जाणिवा तसेच हुपरी पोलिसांची निष्क्रियता व कर्तव्याचा त्यांना पडलेला विसर यामुळे शहरामध्ये वारंवार बंदच्या घटना हुल्लडबाज तरुणांकडून घडवून आणल्या जात आहेत. परिणामी, शहरातील व्यवसाय बंद राहिल्याने व्यवसाय व एस.टी. बस बंद राहत असल्याने प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार अक्षरश: वैतागून गेला आहे. शहरामध्ये विविध कारणांनी वेळोवेळी पुकारण्यात येणारा बंद कायमस्वरुपी थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व जाणकारांनी एकत्रित येण्याची गरज आहे.देशात कोठेही अप्रिय घटना घडली की त्याची खातरजमा करून न घेता विविध पक्ष, संघटना यांच्याकडून शहरामध्ये निषेधाच्या नावाखाली वेळोवेळी बंद पुकारण्यात येतो. बंद काळात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून सनदशीर मार्गाने आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचे असताना अतिउत्साही हुल्लडबाज तरुणांकडून अश्लील भाषेत लाखोली वाहणे, वाहनधारकांना मानसिक त्रास देणे, एस.टी. बसेसवर दगडफेक करून आर्थिक मालमत्तेचे नुकसान करणे, अशा घटना घडवून आणल्या जातात. यातून वादविवादाचे प्रसंग घडले आहेत. एखाद्या अप्रिय घटनेचा निषेध करण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतानाही शहर बंद ठेवून आपल्या संघटनेची किती दहशत आहे, हे दाखविण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अतिरेक होऊ लागला आहे. या बंदमुळे व्यापारी, नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक यांना कशा प्रकारच्या मानसिक, शारीरिक व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते, याची जाणीव या बंद समर्थकांना नाही, हेच यातून दिसते. शहरात बंद पुकारून आपली ताकद व दहशत किती आहे, याचे मूल्यमापन करण्याची जणू फॅशनच होऊन बसल्याचे चित्र आहे. सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी विसरलेले सामाजिक बांधीलकीचे भान, त्यांच्यातील लोप पावत चाललेल्या सामाजिक जाणिवा तसेच हुपरी पोलिसांची त्यांच्या कर्तृत्वाने खालावलेली प्रतिमा, निष्क्रियता, त्यांना पडलेला आपल्या कर्तव्याचा विसर, समाजापेक्षा आपण कोणीतरी वेगळे आहोत, अशी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली चुकीची समजूत, अशा अनेक कारणांमुळे हुल्लडबाजांवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी, ज्येष्ठांची आदरयुक्त भीती, पोलिसांची व कायद्याचा वचक त्यांच्यासमोर निष्प्रभ ठरत आहे. शहरामध्ये वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदला पोलीस खाते, सामाजिक व राजकीय चळवळीतील ज्येष्ठ व जाणकारांनी अतिशय कडक व शिस्तप्रिय अशी भूमिका घेऊन रौप्यनगरीची परंपरा जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा, शहरातील सामाजिक, व्यावसायिक, संस्कृती लोप पावून सामाजिक जाणिवा नसलेले एक रुक्ष शहर, अशी प्रतिमा या रौप्यनगरीची झाल्याचे चित्र आपल्याला पहावयास मिळाल्याशिवाय राहणार नाही.पोलीस उपअधीक्षक चैतन्या एस. यांच्याशी संपर्क साधून याप्रश्नी पोलीस प्रशासनाकडून काही ठोस उपाययोजना केली जाणार आहे काय ? यासाठी प्रयत्न केले असता ते आता दौऱ्यासाठी गेल्याचे त्यांच्या पी.ए.नी सांगितले. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.