शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरचे ‘आनंदी जीवन’ भागवते अनाथांची भूक

By admin | Updated: May 18, 2016 00:19 IST

संजय भोसले यांचा पुढाकार : सामाजिक संस्थेकडून मोफत अन्नछत्र, गेल्या दीड वर्षापासून उपक्रम

जयसिंगपूर : कोणीही भुकेने उपाशी राहू नये, या हेतूने येथील आनंदी जीवन सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने गोरगरीब, अनाथ, अपंग, मनोरुग्ण, गरजू पेशंट यांच्यासाठी एक मोफत अन्नछत्र सरू केले आहे़ याचा वसा येथील संजय भोसले यांनी घेतला असून हा उपक्रम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे़ त्यामुळे जयसिंगपूर शहरात अशा संस्थांचे कौतुक होत आहे़समाजामध्ये अनेक लोक गरिबीच्या विळख्यात पडले आहेत़ वाढती महागाई ही सर्वसामान्य व निराधार व्यक्तींना घातक बनली आहे़ या अनुषंगाने शहरात रस्त्यावर भीक मागणारे लोक अनेक आहेत़ मात्र, यांना दोनवेळचे जेवण मिळावे या हेतूने आनंदी जीवन सामाजिक बहुद्देशीय सामाजिक संस्था कार्यरत आहेत़ या संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांची परिस्थितीही मध्यमवर्गीय आहे़ त्यांनी गरिबीची जाणीव लक्षात घेऊन गेल्या दीड वर्षापासून मोफत अन्नछत्र सुरू केले आहे़ सांगली-कोल्हापूर महामार्गावरील बसस्थानकाजवळ हे अन्नछत्र सुरू केले आहे़ या अन्नछत्राचा दिवसभरात अनेक गोरगरीब, भिकारी, निराधार, मनोरुग्ण, अपंग असे लोक याचा लाभ घेत आहेत़ आनंदी जीवन ही संस्था गोरगरिबच्यिंा जीवनाला आनंद देण्याबरोबर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च चालविते, विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देणे, गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणे, निराधार व गरीब लोकांना वैद्यकीय सेवा देणे तसेच भिकारी लहान मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करून त्यांचे भविष्य घडविण्यासाठी त्यांना आर्थिक बाजूने साहाय्य करून शिक्षणाची सोय उपलब्ध केली जात आहे़ तसेच अंत्यविधीचे साहित्यही गरीब व्यक्तींना पुरविण्याचे काम या संस्थद्वारे होत आहे़ (प्रतिनिधी)आनंदी जीवन संस्थद्वारे अनाथ व गोरगरीब जनतेला आनंदी बनविण्याचे काम ही संस्था करीत असून, जयसिंगपूर शहरातून अनेकांना आधार देण्याचे काम करीत आहे़ यातून एक सामाजिक उपक्रम करीत असून, दानशूर लोकांनी पुढे येऊन या संस्थेला मदत करण्याची गरज आहे़ यातूनच खरे सूख लागेल़- संजय भोसले, अध्यक्ष, आनंदी जीवन संस्था