या फिरस्त्यांची कोरोनामुळे होत असलेल्या उपासमारीचे वास्तव ‘लोकमत’ने दि. ३ मे रोजीच्या अंकात ‘नैवेद्यावर भूक भागविणाऱ्यांची होतेय अडचण’ या वृत्तातून मांडले होते. शहरातील भिकारी, फिरस्त्यांना मंगळवारपेठेतील टीम गणेशाचे समन्वयक प्रशांत मंडलिक हे त्यांच्या परीने चपाती-भाजी पुरवित आहेत. मात्र, त्यांच्याबरोबर समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी अशा लोकांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला काही संस्था, व्यक्तींनी प्रतिसाद दिला. त्यात महाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी चपाती-भाजी, मंगळवारपेठेतील रेणुका भक्त मंडळ (मोहिते, घोरपडे, इंगवले), गृहिणी दीप्ती कदम आणि त्यांच्या ग्रुपने धान्याचे कीट दिले. संभाजीनगर येथील उमेश यादव यांनी फूड पॅकेट, उत्तरेश्वर थाळीचे प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी चपाती-भाजी पॅॅकेट देण्याची तयारी दाखविली आहे. कोल्हापुरातील माधव ढवळीकर, उद्योजक रणजित जाधव आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून धान्य, तर मूळचे कोल्हापुरातील पण अमेरिकेत असणाऱ्या सुप्रिया मेटील, दुबईस्थित अभिजित पाटील, दिल्लीस्थित वृषाली जमादार यांनी धान्यासाठी मदत देण्याबाबत प्रशांत मंडलिक यांच्याशी संपर्क साधला आहे.
प्रतिक्रिया
या फिरस्ते, भिकारी यांची उपासमार टाळण्यासाठी मदतीचे आवाहन करणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर कोल्हापूरसह परदेशातील नागरिकांनी मदत करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला. काहींनी मदतीही दिली आहे. दानशूर व्यक्ती, संस्थांनी आणखी मदतीसाठी पुढाकार घ्यावा.
फोटो (०९०५२०२१-कोल-फिरस्ते न्यूज)
===Photopath===
090521\09kol_5_09052021_5.jpg
===Caption===
फोटो (०९०५२०२१-कोल-फिरस्ते न्यूज)