शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांकडून शेकडो एकरांतील पिके फस्त

By admin | Updated: October 6, 2015 00:22 IST

प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी : पिकांचे पंचनामे करा; चिमणे-चव्हाणवाडी येथील घटना

रवींद्र येसादे - उत्तूर  जोमकाईदेवी येथील डोंगराच्या पलीकडील बाजूस चिमणे (ता. आजरा) येथील म्हसोबा परिसरात वनगायींचा कळप, गवे, रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांनी शेकडो एकरांतील पिके फस्त झाल्याने चव्हाणवाडी-चिमणे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने वन्यप्राण्यांचा, तर महसूल विभागाने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.अधिक माहिती अशी, म्हसोबा परिसरात चिमणे, चव्हाणवाडी, बेलेवाडी (ता. आजरा) परिसरातील क्षेत्र येते. भात, भुईमूग, नाचणा, जोंधळा, आदी पिके घेतली जात आहेत. जोमकाईदेवीच्या डोंगरात वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे. गेली आठ दिवस गवे व वनगायी शेतातील पिके फस्त करीत आहेत. सायंकाळी आठ वाजल्यापासून पहाटेपर्यंत हे प्राणी फिरत असतात.रानडुक्कर व साळिंदर हे प्राणी भुईमुगाचे नुकसान करीत आहेत. काढणी योग्य पिके झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याअगोदरच वन्यप्राणी फडशा पाडत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. भात पिकात तर धुडगूस घातला जात आहे. त्यामुळे हे पीकही शेतकऱ्याला घेता येत नाही.अगोदरच दुष्काळाच्या झळांशी शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यातच वन्यप्राण्यांच्या शिरकाव वाढल्याने शेतीतील पीक असून, नसल्यासारखे शेतकऱ्यांना झाले. वर्षभर मशागत करून शेवटी शेतकऱ्याला काहीच मिळाले नाही, अशी दयनीय अवस्था झाली आहे.नुकसानग्रस्त परिसरातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. प्राण्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मानवी वस्तीत या प्राण्यांचा हल्ला होऊ शकतो. रात्रीचे शेतातील जाणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे.नासधूस अधिकवन्यप्राण्यांकडून पिके खाण्यापेक्षा नासधूस मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बांध पाडणे, झाडे पाडणे, आदी प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नुकसान वाढले आहे.मदत नको, बंदोबस्त कराशेतकऱ्यांना जुजबी मदत देण्यापेक्षा वनक्षेत्र मालकी क्षेत्र यामध्ये वनविभागाने मोठी चर मारावी. त्यामुळे वन्यप्राणी मालकी क्षेत्रात येणार नाहीत. तुमची मदत नको, मात्र बंदोबस्त करा, अशी मागणी चिमणे येथील महादेव आजगेकर यांनी केली आहे.