शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शंभर किलोंचा बोकड, पक्षी आकर्षण

By admin | Updated: January 29, 2017 00:28 IST

भिमा कृषी प्रदर्शन : जिल्ह्यातून शेतकरी, नागरिकांची मोठी गर्दी

कोल्हापूर : भिमा उद्योग समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भिमा कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आबाल-वृद्धांनी एकच गर्दी केली होती. शंभर किलोंचा आफ्रिकन बोर जातीचा बोकड, तर रामचंद्र गायकवाड यांचा सहा फूट उंचीचा पांढराशुभ्र ‘बादल घोडा’, साडेतीन वर्षांचा ‘राजा’ खोंड व विविध रंगाचे पक्षी प्रदर्शनातील आकर्षण आहे. कृषी प्रदर्शनाचा शनिवारी दुसरा दिवस होता. चौथ्या शनिवारची सुटी असल्याने सकाळपासूनच प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली. दुपारी तीननंतर एकदमच गर्दी उसळली. शेती औजारांचे विविध स्टॉलवर शेतकरी सविस्तर माहिती घेत थांबल्याने तिथे गर्दी कायम राहिली. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त ट्रॅक्टर, रोटावेटर, खोडवा तपासणी यंत्र, स्प्रे पंपच्या व्हरायटी पहावयास मिळतात. विविध जातीची जनावरेही आकर्षण ठरत आहेत. सात फूट लांब शिंगे असणारी पंढरपुरी म्हैस, देशी गायी, खिलार पाडी, लातूर येथील केरबा शिंदे यांचा साडेतीन वर्षांचा ‘राजा’ खोंड, सिल्व्हर शाईन (पंजाबी) घोडे, काटेवाडीचा ब्लॅकजॅक घोडा यांनी शनिवारी गर्दी खेचली. साऊद शेख यांचा तीन वर्षांचा आफ्रिकन जातीचा शंभर किलोंचा बोकड पाहण्यासाठी अक्षरश: उड्या पडल्या होत्या. स्ट्रॉबेरी, हळद, आजरा घनसाळच्या स्टॉलनेही गर्दी खेचली. ‘आधुनिक फुलशेती व भाजीपाला लागवडीचे तंत्र’ या विषयावर प्रा. विजयकुमार कानडे, ‘सरकारच्या विविध योजना’ यावर जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी मार्गदर्शन केले. आजचे मार्गदर्शन :ठिबक सिंचन व ऊस - पांडुरंग आव्हाड.नैसर्गिक व सेंद्रिय शेती - जयदेव बर्वे.ऊस शेतीसाठी ठिबक आधुनिक तंत्रज्ञान - प्रा. डॉ. अरुण देशमुख.प्रदर्शनातील आकर्षणशंभर किलो वजनाचा आफ्रिकन बोकड, सात फूट लांब शिंगाची म्हैस, नांदेडचा ‘लाल कंदारी’ वळू, टर्की कोंबड्या, आठ लाख किमतीची खिलार, कडकनाथ कोंबड्या.खाद्यांच्या स्टॉलवर उड्या!यंदा बचत गटांच्या खाद्यांच्या स्टॉलची संख्या अधिक आहे. चमचमीत खाद्यपदार्थांसह आइस्क्रिमच्या विविध व्हरायटीच्या स्टॉलवर शनिवारी दिवसभर गर्दी दिसत होती. जातिवंत जनावरांचे रिंगणप्रदर्शनात सहभागी झालेल्या जातिवंत जनावरांचे रोज सायंकाळी आठ वाजता रिंगण असते. यामध्ये हलगीच्या आवाजावर ठेका धरणाऱ्या जनावरांचे क्रमांक काढले जातात, त्यांचा गौरव प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी करण्यात येतो.