शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

हलकर्णी येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा अक्षरश: धुमाकूळ

By admin | Updated: January 21, 2015 23:57 IST

१२ जण जखमी : जखमींत सहा बालकांचा समावेश

हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. या कुत्र्याने सहा बालकांसह १२ जणांचा चावा घेऊन जखमी केले. काल, मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे हलकर्णीसह पंचक्रोशीत घबराट पसरली आहे. ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, काल सायंकाळी तेरणीकडून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने येथील तेरणी रोड, बस स्टँड परिसर, पाटील गल्ली व भीमनगर येथे धुमाकूळ घातला. लहान बालकांसह समोर दिसेल त्या माणसाचा त्याने चावा घेतला. नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते चंदनकुडच्या दिशेने पळून गेले. कुत्र्याच्या चाव्यात जखमी झालेल्यांची नावे व वय कंसात : अमोल चिदानंद ढंगणावर (वय ६), आेंकार दुंडाप्पा पाटील (४), जयव्वा कल्लाप्पा भोसले (४०), किरण केंप्पाना पाटील (४), प्रीतम संतोष सुरनाईक (५), संभोदन संजय लब्यागोळ (२), राहुल गणपती पाटील (२३), मनीषा प्रकाश इंगळे (२४), मायव्वा सागर कांबळे (५०), सुशीला दुंडाप्पा धनगर (६२), दुंडाप्पा बाळाप्पा पाटील (६०), मायव्वा राजू धनगर (४) यांचा समावेश आहे.जखमींना तत्काळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. याठिकाणी डॉक्टर व लस उपलब्ध नसल्याने जखमींना रात्री गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याठिकाणीही पुरेशी लस उपलब्ध नसल्याने जखमींना सीपीआरला पाठविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपजिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध न झाल्याने जखमींचे नातेवाईक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ‘त्या’ पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी हलकर्णीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मागणी केली आहे. (वार्ताहर) पंचायत समितीच्या सभेत पडसादहलकर्णी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून निष्पाप बालकांसह १२ जणांना जखमी केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद पंचायत समितीच्या आज, बुधवारच्या मासिक सभेत उमटले.अनेक वर्षांपासून मागणी करूनही हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक अथवा पर्यायी व्यवस्था झाली नाही. या रुग्णालयात डॉक्टर नाही आणि ‘रेबीज’ लससुद्धा उपलब्ध नसल्यामुळे कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांची हेळसांड झाली. याला जबाबदार कोण ? आता तरी या रुग्णालयाला डॉक्टर द्या, अशी मागणी बाळेश नाईक यांनी केली. अमर चव्हाण व अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनीही त्यांच्या मागणीस दुजोरा दिला.हलकर्णी येथील घटना आणि पंचक्रोशीतील रुग्णांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन मुंगूरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची हलकर्णी केंद्रात बदली करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.