शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हुक्केरीत दोन माजी मंत्र्यांमध्ये लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:51 IST

हुक्केरी: बेळगाव जिल्ह्णातील हुक्केरी मतदारसंघामध्ये उमेश कत्ती (भाजप) आणि आप्पगौडय्या पाटील (राष्ट्रीय काँग्रेस) या दोन माजी कॅबिनेट मंत्र्यांमधील लढत लक्षवेधी ठरली आहे.

समीर देशपांडे ।हुक्केरी: बेळगाव जिल्ह्णातील हुक्केरी मतदारसंघामध्ये उमेश कत्ती (भाजप) आणि आप्पगौडय्या पाटील (राष्ट्रीय काँग्रेस) या दोन माजी कॅबिनेट मंत्र्यांमधील लढत लक्षवेधी ठरली आहे. ‘पक्षापेक्षा व्यक्ती मोठी’ या सूत्रानुसार इथली निवडणूक होत आहे.

कत्ती हे नवव्यांदा या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत असून आठपैकी सात निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. पूर्वी काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास असलेले कत्ती हे येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषीमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा कर्नाटकचे स्वतंत्र कृषी अंदाजपत्रक मांडले होते. स्वत:चा खासगी साखर कारखाना आणि संकेश्वर येथील ‘हिरा शुगर’वर सत्ता ही त्यांची जमेची बाजू आहे.

शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेले आप्पगौडया पाटील हे काँग्रेसचे या परिसरातील ज्येष्ठ नेते असून त्यांचे वडील बसगोंडा पाटील यांचा ‘हिरा शुगर’च्या स्थापनेमध्ये मोलाचा वाटा होता. पटेल यांच्या मंत्रिमंडळामध्ये कत्ती आणि पाटील हे दोघेही कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते. जनता दलाच्यावतीने निवृत्त वरिष्ठ अभियंता मल्लिकार्जुन पाटील हे निवडणूक लढवत असून ‘हिरा शुगर’चे संस्थापक आप्पनगौडा पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. याशिवाय राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही येथे उमेदवार उभे केले आहेत.वीज संघाचा सत्तेसाठी वापरकर्नाटकातील ‘पायलट प्रकल्प’ म्हणून स्थापन करण्यात आलेला ‘हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघ’ हा उमेश कत्ती यांच्या ताब्यात आहे. शासनाकडून वीज खरेदी करून ती नागरिक, शेतकऱ्यांना पुरविण्याची हुक्केरी तालुक्यातील संपूर्ण जबाबदारी या संघाकडे आहे. या सत्तेचा प्रभावी वापर कत्ती यांच्याकडून केला जातो.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८