शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘आजरा’साठी नेतेमंडळींच्या अस्तित्वाचा कस लागणार

By admin | Updated: May 5, 2016 00:51 IST

आजरा-श्रृंगारवाडी गट : मातब्बर परस्परविरोधात दंड थोपटणार

ज्योतीप्रसाद सावंत --आजरा  साखर कारखाना निवडणुकीत राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आजरा-श्रृंगारवाडी गटामध्ये उत्पादक गटातून मातब्बर नेतेमंडळी परस्परविरोधात दंड थोपटणार असल्याने प्रमुख नेतेमंडळींच्या राजकीय अस्तित्वाची लढाई याच गटातून होणार आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.मुळातच या गटात आजरा शहराचा समावेश असल्याने आणि सर्वच प्रमुख संस्थांचा कारभार आजऱ्यातून चालत असल्याने या गटामध्ये ज्या नेतेमंडळींना आपले वर्चस्व सिद्ध करता येते, ती मंडळी तालुक्याच्या राजकारणात वर्चस्व निर्माण करू शकतात हे इतिहासाने सिद्ध करून दाखविले आहे.स्व. वसंतराव देसाई शेतकरी विकास आघाडीने या गटातून आघाडीप्रमुख अशोकअण्णा चराटी, माजी साखर कारखाना उपाध्यक्ष दिगंबर देसाई आणि तालुका संघाचे माजी उपाध्यक्ष राजू होलम यांना संधी दिली आहे. विरोधी राष्ट्रवादी व समविचारी आघाडीकडून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, विद्यमान अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा व माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची उमेदवारी निश्चित आहे.या गटातून एकूण २९ उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी प्रमुख दोन आघाड्यांमधील उमेदवार निश्चित असल्याने उमेदवारीतून नाराज मंडळींच्या भूमिकेवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. या गटात सर्वांत जास्त मतदान आजरा (१४३५), तर सर्वांत कमी मतदान भावेवाडी (५८) येथे आहे.सर्वच पक्ष व गटा-तटाचे राजकारण या गटामध्ये असल्याने प्रमुख उमेदवारांना मताधिक्याची निश्चित गणिते या गटात मांडता येत नाहीत हे वास्तव आहे. स्व. देसाई आघाडीतून ६५८ मतदार असणाऱ्या वाटंगी गावातून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही, तर शिरसंगी या ६०८ मतदार असणाऱ्या गावातून राष्ट्रवादीची उमेदवारी अद्याप निश्चित नाही.जयवंतराव, मुकुंदराव, अशोकअण्णा, दिगंबर देसाई, अल्बर्ट डिसोझा व राजू होलम हे सर्वच मातब्बर या गटातून असल्याने अत्यंत चुरशीची लढत या मतदारसंघात होणार हे स्पष्ट आहे.