शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

...तर कसा होईल शहराचा ‘विकास’? वर्ग एकपासून वर्ग तीनची निम्मी पदे रिक्त : चतुर्थ श्रेणीतील ७५० जागा भरणार कधी ?

By admin | Updated: May 14, 2014 00:44 IST

गणेश शिंदे ल्ल कोल्हापूर लोकप्रतिनिधींच्या ‘टक्केवारी’च्या त्रासाला कंटाळून महापालिकेतील अधिकारी नोकरीचा राजीनामा देत आहेत

 गणेश शिंदे ल्ल कोल्हापूर लोकप्रतिनिधींच्या ‘टक्केवारी’च्या त्रासाला कंटाळून महापालिकेतील अधिकारी नोकरीचा राजीनामा देत आहेत, काहीजण बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत, तर काहीजण आपल्या मूळ जागी (महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी) जाण्यासाठी धडपडत आहेत. महापालिकेत सद्य:स्थितीत क्लास वनपासून क्लास थ्रीपर्यंतची निम्मी पदे रिक्त आहेत. जर काम करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची पुरेशी संख्या नसेल तर त्याचा थेट परिणाम शहराच्या विकासावर होतो. कोल्हापूरकरही आता त्याचा अनुभव घेत आहेत. विशेष म्हणजे, शहरातील मूलभूत विकासकामांसाठी थेट संबंधित असणार्‍या चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची ३६९६ पैकी ७५० पदे रिक्त आहेत. दरम्यान, याबाबत महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. ‘टक्केवारी’च्या कॅन्सरने यंत्रणा जर्जर महापालिकेच्या प्रत्येक कामात ‘अर्थ’ शोधणारी साखळी तयार झाली आहे. खड्डे मुजविण्यापासून रस्ता तयार करण्यापर्यंत तसेच पाण्याचा टँकर पुरविण्यापासून शहरासाठी पाईपलाईन योजना राबविण्यापर्यंत प्रत्येक विकासकामात काही लोकप्रतिनिधींना टक्केवारी ही पाहिजेच असते. त्यासाठी कधी अधिकार्‍यांशी हातमिळवणी करून, तर कधी-कधी अधिकार्‍यांना धमकावून ‘टक्केवारी’ पदरात पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अलीकडील जलअभियंता मनीष पवार यांच्या रजानाट्यावरून स्पष्ट झाले. नेतेही टक्केवारी रोखण्यात ‘हतबल’ मनीष पवार यांच्या दीर्घ रजाप्रकरणानंतर लोकप्रतिनिधींच्या खाबुगिरीचा आणखी एक नमुना समोर आला. टक्केवारीसाठी लोकप्रतिनिधी धमकावीत असल्याने पवार यांनी आपल्या मूळ जागी म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा व्हायचा तोच परिणाम झाला. महापालिकेचे कार्यक्षम अधिकारी असे जाऊ लागले तर विकासकामांवर तर परिणाम होईलच; शिवाय सत्ताधारी पक्षाची जनमानसात बदनामी होईल, हे स्पष्ट होते. त्यामुळे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली; पण त्यावेळी त्यांनी महापालिकेतील टक्केवारी रोखण्यातील हतबलता व्यक्त केली.