शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दोषारोपपत्र दाखल नसताना बदली कशी?

By admin | Updated: December 4, 2015 00:55 IST

पोलीसप्रमुखांच्या बदलीप्रश्नी भाकपचा सवाल : समीर गायकवाडने ब्रेन मॅपिंगसाठी संमती द्यावी; ‘सनातन’वर बंदी घाला

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पकडण्यात आलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडचा पूर्ण तपास होऊन अजून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. अशा परिस्थितीत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांची बदली शासनाने कशी केली? असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सतीशचंद्र कांबळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. शासन खुन्यांच्या बाजूचे आहे; त्यामुळे तपासावर परिणाम व्हावा, यासाठीच डॉ. शर्मा यांची बदली केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. कांबळे म्हणाले, अ‍ॅड. पानसरे यांच्या हत्येच्या तपासात डॉ. शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दबाव झुगारून त्यांनी समीरला अटक केली. शासनाने शर्मांची अचानकपणे बदली केली. शर्मा यांनी विनंती केल्यानेच बदली झाली आहे, असे समजले आहे. मात्र, अ‍ॅड. पानसरे यांच्या हत्येचा तपास अर्धवट असताना शासनाने त्यांची विनंती त्वरित मान्य करून त्यांची बदली केली कशी ? समीर गायकवाड खुनी नाही, असे सनातन संस्थेचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर, पॉलिग्राफ चाचण्यांना संमती द्यावी. वकीलपत्र घेतलेल्या वकिलांनी समीरला या चाचण्यांसाठी संमती देण्यास सांगावे. समीरने पोलिसांवर २५ लाखांचा खोटा आरोप करून दिशाभूल केली आहे. त्याला न्यायालयात घेऊन जाताना आम्ही पाठोपाठ होतो. त्यावेळी समीर कोणत्याही पोलिसाशी बोलताना दिसून आला नाही. असे असताना संभ्रम वाढविण्यासाठी समीरने आरोप केले आहेत. ‘सनातन’चे अभय वर्तक पुरोगामी संघटनांवर आरोप करीत आहे. सनातन संस्था समाजविघातक कारवाया करीत असते. सन २००८ मध्ये ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही ‘सनातन’चा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाशीतील बॉम्बस्फोटात ‘सनातन’च्या सहा साधकांवर आरोप आहेत. आरोप असलेले रुद्र पाटील (सांगली), प्रवीण लिमकर (कोल्हापूर), सारंग अकोलकर, जयप्रकाश उर्फ अण्णा यांना फरार घोषित केले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील आरोपीही ‘सनातन’शी संबंधित असल्याचे पुढे आले आहे. ही पार्श्वभूमी असल्यामुळेच सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत, असे कांबळे म्हणाले. अ‍ॅड. पानसरे, डॉ. दाभोलकर, डॉ. कलबुर्गी यांच्या खून प्रकरणाचा तपास गतीने करावा. यावेळी अनिल चव्हाण, दिलदार मुजावर, प्रशांत आंबी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)