शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय छळछावणीत किती दिवस ?

By admin | Updated: March 29, 2015 00:18 IST

अभयारण्यग्रस्तांचा सवाल : ठिय्या आंदोलन सुरूच; कडाक्याचा उष्मा, वळवाचा तडाखा

भारत चव्हाण / कोल्हापूर ज्याला कोणी नाही, त्यांना शेवटी सरकार वाली असतं, असं म्हणतात; पण सरकारनंही जर वाऱ्यावर सोडलं तर? तर मग त्यांची काही खैर नाही. गोरगरीब, कष्टकऱ्यांना वाली नाही म्हणतात, तेच खरं. याचा अनुभव चांदोली अभयारण्यातील गोरगरीब, कष्टकरी जनता गेल्या १३ दिवसांपासून घेत आहे. कैक वर्षे सरळ मार्गाने न्याय-हक्कांसाठी लढा केला; पण कोणी दखल घेतली नाही. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांचं दार ठोठावलं. त्यांनीही गांभीर्यानं घेतलं नाही. सरकार तर दूरच राहिले. कडाक्याचा उष्मा आणि वळवाचा पाऊस अंगावर झेलत, मिळेत तसं शिळंपाकं खाऊन हे कोमेजलेले अभयारण्यग्रस्त आणखी किती दिवस या शासकीय छळछावणीत मुक्काम ठोकायचा, असा संतप्त सवाल करत आहेत. चांदोली अभयारण्यातील सात गावांतील गरीब जनता योग्य पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. देय असलेल्या जमिनी त्यांना मिळालेल्या नाहीत. रोखीनं मोबदला मिळालेला नाही. विस्थापित ठिकाणी नागरी सुविधाही दिलेल्या नाहीत. त्यासाठी गेल्या १५-१६ वर्षांपासून लढा सुरू आहे. आता खूप झालं म्हणत अभयारण्यग्रस्तांनी १६ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे; पण अभयारण्यग्रस्तांनी आपली जिद्द सोडलेली नाही. जमीन व मोबदला मिळत नाही, तोपर्यंत जागचं हलायचं नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. सात गावांतील घरटी एक माणूस या ठिय्या आंदोलनात सहभागी झाला आहे. दोन दिवसाआड गावाकडून येणाऱ्या डब्यातील भाजी-भाकरी खाऊन आपला लढा सुरू ठेवला आहे. शिळंपाकं खायचं आता त्यांच्या अंगवळणी पडलंय. आंदोलकांपैकी काहीजण गावाकडं जातात, येताना जेवणाचे डबे घेऊन येतात. उन्हाळ्यात भाजी खराब होते, म्हणून काहींच्या डब्यात तर कांदा, चटणी, खरडा असले पदार्थ ठरलेले आहेत. रोज तेच ते खाऊन त्यांनाही कंटाळा आलायं; पण नाईलाज आहे. सरकार दाद लागू देईना आणि स्थानिक अधिकारी सहकार्य करेनात, अशी त्यांची गत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा म्हणून विनंत्या केल्या; पण कोणीही त्यांची दखल घेतलेली नाही. घासभर खाल्ल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी महावीर गार्डनचा परिसर पालथा घालावा लागतो. रात्रीची झोप, प्रातर्विधी, रोजची अंघोळ यांचं गणित आणि वेळ चुकली आहे. एकाच ठिकाणी बसल्यामुळे आंदोलकांच्या चेहऱ्यावरील हास्य कधीच लोप पावले आहे. आंदोलनाचं काय होणार, जमीन व मोबदला मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत असून, याचा तणाव अभयारण्यग्रस्तांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतोय. कोमेजलेले, चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त अभयारण्यग्रस्त, ‘आणखी किती दिवस या शासकीय छळछावणीत राहायचं’ असं विचारत आहेत.