शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता राबवायची कशी?

By admin | Updated: December 25, 2015 00:48 IST

निवडणूक यंत्रणेची हतबलता : मतदार सहलीवर गेल्याचा पुरावा नाही विधान परिषदेचे रणांगण

प्रवीण देसाई -- कोल्हापूर --प्रसारमाध्यमांमधून मतदार सहलीवर गेल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याचा सकृतदर्शनी पुरावा उपलब्ध नसल्याने आचारसंहिता भंगाची कारवाई करायची कशी असा पेच विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यान्वित केलेल्या यंत्रणेला पडला आहे. आचारसंहिता भंगाबद्दल कोणाकडूनही तक्रारही दाखल झालेली नाही. कारण महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील या दोन्हीही उमेदवारांकडून मतदार सहलीवर गेल्याची चर्चा असल्याने तक्रार करणार तरी कोण? कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील व अपक्ष म्हणून आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहे. दोन्हीकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष कोल्हापूरकडे लागून राहिले आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणाही गतिमान झाल्या आहेत. इतर निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत खर्च करण्यास मर्यादा नाही व हिशेब सादर करण्याची सक्ती नाही, असे असले तरी एकंदरीत प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आचारसंहिता पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे. इतर निवडणुकांमध्ये जाहीर प्रचार, कोपरासभा, प्रचारसभा, पदयात्रा, रोड शो असा जाहीर स्वरूपाचा प्रचार असतो. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्यास उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यासंदर्भात विरोधी उमेदवाराविरोधात निवडणूक विभागाकडे तक्रार करू शकतात. याउलट कोणताही जाहीर प्रचार न करता उमेदवारांकडून मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठी घेतल्या जातात तसेच आचारसंहिता भंगसंदर्भातील तक्रारी या निवडणुकीतही दाखल केल्या जाऊ शकतात, असे असतानादेखील कोणाकडूनही निवडणूक यंत्रणेकडे तक्रार दाखल झाली नाही.मतदार सहलीवर नेणे हे एकप्रकारे आमिषच आहे; परंतु या सहलींबाबत भक्कम पुरावा मिळत नसल्याने निवडणूक यंत्रणेला थेट त्यांच्यावर आचारसंहितेची कोणतीही कारवाई करता येत नसल्याचे चित्र आहे. कारवाई कशी करायची आणि कोणावर, अशा पेचात निवडणूक यंत्रणा दिसत आहे. याशिवाय आचारसंहिता भंगाबद्दल कारवाई करायची म्हटल्यावर त्याची कोणी तरी तक्रार देणे अपेक्षित आहे; परंतु ही तक्रार देणार कोण हा प्रश्न आहे.