शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आवाडे-आवळे एकत्र ?

By admin | Updated: January 24, 2017 23:11 IST

हातकणंगलेत घडामोडी : राजू शेट्टींचा पुढाकार; जिल्ह्यात आघाडी करणार

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यात आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासोबत आघाडी करत असताना त्यामध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयवंतराव आवळे यांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. हातकणंगले तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस, जनसुराज्य, ताराराणी अशी मोट बांधली आहे. आघाडीच्या प्रक्रियेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कुठेच स्थान न दिल्याने त्यांनी प्रकाश आवाडे, सुजित मिणचेकर यांना सोबत घेऊन आघाडीची बांधणी सुरू केली आहे. याबाबतची प्राथमिक बैठक सोमवारी रात्री एका अज्ञातस्थळी झाली. त्यामध्ये एकत्रित येण्याबाबत जवळपास एकमत झाले आहे; पण या आघाडीत कॉँग्रेसचे जयवंतराव आवळे यांनाही सामावून घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी खुद्द राजू शेट्टी प्रयत्नशील असून, येत्या दोन दिवसांत आवळे यांच्याशी चर्चा करून आघाडीवर शिक्कामोर्तब करणार आहेत. भाजपने ‘स्वाभिमानी’ला बेदखल केल्याने आक्रमकपणे जुळवाजुळव सुरू केली. शिरोळमध्ये स्वबळावर लढताना तिथे स्थानिक पातळीवर तडजोड करण्याची तयारी राजू शेट्टी यांनी ठेवली आहे. गडहिंग्लजमध्ये माजी आमदार श्रीपतराव शिंदे, सदानंद हत्तरकी यांच्यासोबत ‘स्वाभिमानी’ची बोलणी सुरू आहेत. चंदगडमध्ये भाजपचे गोपाळराव पाटील व काँग्रेसचे भरमूण्णा पाटील, ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील या दोन्ही गटांबरोबर चर्चा सुरू आहे. भुदरगड व शाहूवाडीमध्ये स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी केली आहे. पन्हाळ्यात काँग्रेससोबत, तर करवीरमध्ये चर्चा झालेली नाही. १६ ते १७ जागा ताकदीने लढण्याची तयारी ‘स्वाभिमानी’ने केली आहे. हातकणंगलेत सुजित मिणचेकर, प्रकाश आवाडे यांच्या सोबत जयवंतराव आवळे यांनाही आघाडीत घेण्याचा प्रयत्न आहे. आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाली असली तरी सर्वजण सकारात्मक असल्याने दोन दिवसांत आघाडीची घोषणा होईल. - राजू शेट्टी, खासदारहातकणंगलेमध्ये आम्ही एकत्र येण्याचे ठरले आहे. जागावाटप कसे करायचे हे दोन दिवसांत ठरविले जाणार आहे. - डॉ. सुजित मिणचेकर, आमदार नवा पेच : ‘राधानगरी’चा निर्णय लटकणार!जिल्हा परिषद निवडणुकीबरोबरच ‘भोगावती’ साखर कारखान्याची निवडणूक लागल्याने राधानगरी तालुक्यात आघाडीबाबत ‘स्वाभिमानी’समोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील निर्णय लोंबकळण्याची शक्यता आहे.