शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मंडलिकांना पावणेसहा लाख मते कशी पडली?

By admin | Updated: June 13, 2016 00:51 IST

धनंजय महाडिक : कधी कुणाला चहा दिला नसल्याचाही टोला

कोल्हापूर : कोणास एक कप चहा न दिलेले आणि ओळख नसलेल्या संजय मंडलिक यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत पावणेसहा लाख मते कशी पडली, असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी केला. मला तीन लाख मताधिक्याने निवडून येण्याचा आत्मविश्वास होता. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळेच ४० हजार मतांनी विजयी झालो, असे त्यांनी सांगितले.येथील दसरा चौकातील जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या जैन जागृती सेंटरच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. सेंटरच्या केंद्रीय बोर्डाचे अध्यक्ष संजय शहा अध्यक्षस्थानी होते. आॅल इंडिया जैन मायनॉरिटी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, रमेश मोरबिया, किशोर शेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘टॉप थ्री’ खासदारांमध्ये निवड झाल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार झाला. खासदार महाडिक म्हणाले, सामाजिक क्षेत्रात प्रचंड काम केले, गरजूंना मदत केली. शेळी-मेंढी वाटप, कृषी प्रदर्शन, झिम्मा-फुगडी असे उपक्रम घेतले; परंतु, मोदीच्या लाटेमुळे जैन समाजातील काही जणांनी शिवसेनेला मतदान केले. त्यामुळेच मंडलिकांना तितकी मते पडली. मी खासदार झाल्यानंतर दोन वर्षांत कोल्हापूर जिल्हा, राज्याचे विविध प्रश्न संसदेत अभ्यासपूर्ण मांडले म्हणूनच ज्यांनी मला मते टाकली त्यांचे मत वाया गेले नाही. त्यामुळे गेल्यावेळी मला ज्यांनी मदत केली नाही, त्यांनी पुढील वेळी मला मदत करावी. जैन समाजाने आपल्या समाजातील गरजू विद्यार्थ्यांना ४३ कोटी रुपयांची बिनव्याजी कर्ज दिले आहे, हे कौतुकास्पद आहे; परंतु, जैन सेंटरने इतर समाजातील गरीब विद्यार्थ्यांना कमीत कमी चार लाखांची तरी मदत करावी. यावेळी ललित गांधी, जयेश ओसवाल, नूतन अध्यक्ष कांतीलाल ओसवाल यांची भाषणे झाली. त्यानंतर ओसवाल यांनी मावळते अध्यक्ष देवीचंद ओसवाल यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. शेफाली मेहता यांनी सूत्रसंचालन केले. विजय शहा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)महाडिकांचा वशिला..इंटरनेटच्या माध्यमातून सन १९५२ नंतर देशातील कोणत्या खासदारांनी किती प्रश्न विचारले, त्याची उपस्थिती किती होती या संबंधीची कुंडली मिळते. त्यामुळे ‘टॉप थ्री’ खासदारात येण्यासाठी महाडिकांनी वशिला लावला असेल, असे कोणास वाटत असेल तर ते खोटे आहे. नावाचा लौकीक होण्यासाठी सभागृहात चांगले काम करणे गरजेचे आहे किंवा सभागृहाबाहेर मारामारी करावी (उपरोधाने) असे दोन पर्याय असतात. मी कोल्हापूरचा असूनही मारामारी करू शकत नव्हतो, त्यामुळे संसदेत प्रभावी काम करून नावलौकीक मिळविला, असे महाडिक सांगताच एक हशा पिकला. कृती समिती तयार होऊ नये म्हणून..वारंवार पाठपुरावा करून शहराच्या प्रवेशद्वारावर बास्केट ब्रीज मंजूर करून घेतला. त्यासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटींची तरतूद करून घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. हे पहिल्यादांच सांगितले असते तर ‘हे होता कामा नये’ म्हणत कृती समिती तयार झाली असती, असा उपरोधिक टोला महाडिक यांनी लगावला.