शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
7
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
8
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
9
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
10
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
11
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
12
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
13
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
14
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
15
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
16
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
17
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
19
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
20
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

सभागृहे, समाज मंदिरे संस्थांना भाडेतत्त्वावर : शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:06 IST

कोल्हापूर : आमदार निधीतून बांधण्यात आलेली समाज मंदिरे, सामजिक सभागृहे, बालवाडी, अंगणवाडी, व्यायामशाळांच्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना

ठळक मुद्देभाडे ठरविण्यासाठी समितीची नेमणूक

 समीर देशपांडे ।कोल्हापूर : आमदार निधीतून बांधण्यात आलेली समाज मंदिरे, सामजिक सभागृहे, बालवाडी, अंगणवाडी, व्यायामशाळांच्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना करणे शक्य नसल्यास या इमारती सामाजिक संस्थांना भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे.

विविध संस्था, संघटना, ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार गेली अनेक वर्षे विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी या मालमत्ता उभारण्यासाठी निधी दिला आहे. सुरुवातीला उत्साहाने विविध समाजांनी सांस्कृतिक सभागृहे बांधून घेतली. अनेक ग्रामपंचायती, नगर परिषदांनी व्यायामशाळा बांधल्या. समाज मंदिरे बांधण्यात आली; परंतु नंतर नंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदांना या सर्व इमारतींचा दुरुस्ती आणि देखभाल यांचा खर्च झेपेनासा झाला.

यावर उपाय म्हणून शासनाने आता अशा इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती जर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना करणे शक्य नसेल, तर या इमारती सामाजिक नोंदणीकृत संस्थांना भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत. मात्र, याची मालकी शासनाचीच राहणार आहे. ज्या इमारती भाडे तत्त्वावर द्यावयाच्या आहेत, अशा इमारतींची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी. स्थानिक प्रसिद्धीही द्यावी आणि सामाजिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार या इमारतींच्या देखभाल, दुरुस्तीसाठी संस्थांची नियुक्ती करावी, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. भाडे ठरविण्यासाठी आणि संस्था निवडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून, जिल्हा नियोजन अधिकारी या समितीचे सचिव असतील.सामाजिक संस्थांना अटीज्या सामाजिक संस्थांना इमारती देखभाल आणि दुरुस्तीसाठी देण्यात येणार आहेत, त्यांना कोणतेही शासकीय अनुदान मिळणार नाही. त्यांनी सार्वजनिक कामासाठीच इमारतींचा वापर करावयाचा आहे. वास्तूच्या दर्शनी भागावर जिल्हाधिकाºयांनी विहित केलेला फलक लावावा लागेल. तसेच वाढीव बांधकाम करता येणार नाही. तीन वर्षांसाठी हा करार करण्यात येईल.या संस्था राहतील पात्रमुंबई विश्वस्त अधिनियम १९५0 किंवा संस्था नोंदणी अधिनियम १८६0 या नियमाखाली संस्था नोंदणीकृती असावी. तीन वर्षांचे लेखापरीक्षण असावे. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर संस्था कार्यरत असावी आणि संस्थेच्या सभासदांवर फौजदारी न्यायालयात गुन्हे सिद्ध झालेले नसावेत, अशा संस्था यासाठी पात्र राहणार आहेत. 

महाराष्ट्र शासनाने हा एक चांगला निर्णय घेतला आहे. अनेक गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबविणाºया संस्था आहेत. तसेच अशा पद्धतीच्या अनेक इमारतीही विनावापर पडून आहेत. संस्थेला इमारत मिळेल आणि इमारतींची देखभालही होईल. सार्वजनिक पैसा या इमारतींवर खर्च झाल्याने त्या पडून राहण्यापेक्षा वापरात येण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल.अ‍ॅड. हेमंत कोलेकर, जिल्हा परिषद सदस्य, नेसरी, ता. गडहिंलज